१९८० पासून जळगाव शहरावर वर्चस्व असलेले सुरेश जैन यांना पराभूत करून भाजपचे सुरेश भोळे हे ‘जायंट किलर’ करले. पक्ष कुठलाही असो पण, जैन यांनी सदैव शहरावरील आपली सत्ता अबाधित ठेवली होती. जैन यांच्या ३५ वर्षांच्या सत्तेला भोळे यांनी सुरूंग लावला. भोळे यांनी पक्ष बांधणीत महत्वाची भूमिका बजावली आहे. भाजपचे महानगर अध्यक्ष असून तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. लेवा पाटील समाजाचे मतदारसंघावर असलेल्या प्राबल्याचा भोळे यांना लाभ झाला. सामाजिक कार्यामुळे त्यांनी शहरात सामाजिक कार्यकर्ता म्हणून ओळख निर्माण केली आहे. उत्तम संघटन कौशल्य, व्यापारी वर्गाशी असलेली मैत्री याचाही त्यांना विजयासाठी हातभार लागला. भाजपला असलेले पूरक वातावरण, जनसंपर्क, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभेस मिळालेला प्रतिसाद याचा फायदा झाल्याने तब्बल ३० हजार ५७९ मताधिक्काने ते विजयी झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा