पेडन्यूजवर र्निबध आणण्यासाठी निवडणूक आयोगाने कंबर कसली असली तरीही राज्यात पेडन्यूजच्या माध्यमातून सर्रास प्रचार सुरू असल्याचे आढळून आले आहे. अशाच एका प्रकरणात माजी सहकारमंत्री आणि इंदापूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार हर्षवर्धन पाटील आणि त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्तात्रय भरणे यांना पेड न्यूज संदर्भातील जिल्हा समितीने दोषी ठरविले आहे. पुण्यातून प्रसिद्ध होणाऱ्या एका ‘पॉवर’फुल दैनिकात याबाबतच्या बातम्या प्रसिद्ध होत होत्या.
  गेल्या काही वर्षांपासून इंदापूर विधानसभा मतदारसंघात आपली हुकुमत निर्माण करणाऱ्या हर्षवर्धन पाटील यांना त्यांच्या विरोधकांनी म्हणजेच राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे, ज्ञानदेव चावरे (भाजप), विशाल बोंद्रे (शिवसेना), सुनील झेंडे (बसपा) या उमेदवारांनी यंदा प्रथमच कडवे आव्हान निर्माण केले आहे. साहजिकच या अटीतटीच्या लढतीत आपला प्रचार करण्यासाठी आणि मतदारांवर प्रभाव पाडण्यासाठी उमेदवारांकडून अनेक मार्गाचा अवलंब केला जात आहे. यापैकी काही उमेदवारांकडून आपल्या प्रसिद्धीसाठी चक्क पेडन्यूजचा वापर केला जात असल्याचे आढळून आले आहे.
पाटील आणि भरणे यांनी एकाच वृत्तपत्रातून आपली जाहिरात मोहीम चालविली असल्याचे निदर्शनास आल्यानंतर जिल्हास्तरीय मीडिया मॉनिटरिंग अॅण्ड सर्टिफिकेशन समितीने या दोघांनाही नोटिसा पाठविल्या होत्या. त्याला उत्तर देताना आपण कोणत्याही प्रकारच्या पेडन्यूज दिलेल्या नसल्याचा दावा या दोन्ही उमेदवारांनी केला, मात्र समितीने आज त्यांचा हा दावा फेटाळून लावत दोघांनाही पेडन्यूजप्रकरणी दोषी ठरविल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा