अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद, १३० पेक्षा अधिक जागा आणि पक्षात प्रवेश करणाऱ्या अपक्ष आमदारांचे मतदारसंघ सोडणे या अटींमुळे राष्ट्रवादीच्या भूमिकेबद्दल काँग्रेसमध्ये संशयाचे वादळ माजले आहे. या पाश्र्वभूमीवरच, आघाडी तुटली, तर त्याची जबाबदारी आमची नाही, असा पवित्रा घेत सारे खापर राष्ट्रवादीवर फोडण्याचा प्रयत्न काँग्रेसने सुरू केला आहे. राष्ट्रवादीचा एकूण रागरंग लक्षात घेता काँग्रेस नेत्यांच्या आशा मावळल्या आहेत. पुन्हा सत्ता मिळण्याबाबत सारेच धूसर असतानाही, अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद मिळावे ही अट राष्ट्रवादीने घातली. निम्म्या जागांवर अद्यापही आग्रही असल्याचे राष्ट्रवादीचे नेते सांगत असले तरी १३४ जागांचे सूत्र राष्ट्रवादीकडून मान्य केले जाईल, अशी चिन्हे आहेत. अपक्ष आणि छोटय़ा पक्षांचे दहा आमदार अलीकडेच राष्ट्रवादीत दाखल झाले आहेत. मात्र यातील आठ जणांचे मतदारसंघ गेल्या वेळी काँग्रेसकडे होते. हे मतदारसंघ आता राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणाऱ्या आमदारांसाठी सोडावेत, अशी ही राष्ट्रवादीची आणखी अट आहे.
राष्ट्रवादीची गुगली
सध्याच्या परिस्थितीत काँग्रेसप्रमाणेच राष्ट्रवादीलाही वातावरण अनुकूल नाही. अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद मिळावे, अशी मागणी करीत आमचा पक्ष मोठा असल्याचा भासविण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न असल्याचे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे. अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद मिळावे ही राष्ट्रवादीची अट असल्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांनी सांगितले. आमचा प्रस्ताव काँग्रेसला सादर केला असून, त्यांच्याकडून प्रतिसाद अपेक्षित असल्याचे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले. राणे यांनी प्रस्ताव उघड केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली होती.
काँग्रेस साशंक!
अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद, १३० पेक्षा अधिक जागा आणि पक्षात प्रवेश करणाऱ्या अपक्ष आमदारांचे मतदारसंघ सोडणे या अटींमुळे राष्ट्रवादीच्या भूमिकेबद्दल काँग्रेसमध्ये संशयाचे वादळ माजले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 24-09-2014 at 03:12 IST
मराठीतील सर्व विधानसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: If alliance breaks ncp will be responsible says congress