सिंचनावरून गेली सहा वर्षे आपल्यावर सातत्याने आरोप केले जातात. डॉ. चितळे समितीने आपल्याला क्लिनचिट दिली आहे. कोंबडा झाकून ठेवला तरी पहाटे पाच वाजता तो आरवायचे थांबत नाही, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते अजित पवार यांनी आपण काहीही वेडेवाकडे केले असते तर ते उघड झाले असते, असेच सूचित केले.
स्थैर्य आणि विकासाच्या मुद्दयावर सर्वाधिक जागा मिळालेल्या भाजपला बिनशर्त पाठिंबा देण्याची तयारी राष्ट्रवादीने दर्शविली आहे. याचा अर्थ आम्ही सरकारमध्ये सहभागी होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. आपल्यासह राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवरील आरोपांच्या पाश्र्वभूमीवर चौकशी होऊ नये म्हणूनच भाजपला पाठिंबा देण्याची तयारी दर्शविली का, या प्रश्नावर अजितदादांनी नकारात्मक उत्तर दिले. राष्ट्रवादीवर खोटेनाटे आरोप करण्याची सवयच अनेकांना जडली आहे. हे आरोप कोणीही सिद्ध केलेले नाहीत.
विरोधी पक्षनेतेपदावर दावा
काँग्रेसचे ४२ तर राष्ट्रवादीचे ४१ आमदार निवडून आले आहेत. राष्ट्रवादीने पाठिंबा दिलेले पाच आमदार निवडून आले आहेत. यामुळेच निवडणूकपूर्व आघाडीनुसार आम्हाला ४६ आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे वेळ आल्यास यातूनच राष्ट्रवादी विरोधी पक्षनेते पदावर दावा करेल, असे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले.
कोंबडा झाकला तरी, आरवायचे थांबत नाही
सिंचनावरून गेली सहा वर्षे आपल्यावर सातत्याने आरोप केले जातात. डॉ. चितळे समितीने आपल्याला क्लिनचिट दिली आहे. कोंबडा झाकून ठेवला तरी पहाटे पाच वाजता तो आरवायचे थांबत नाही,
First published on: 21-10-2014 at 02:44 IST
मराठीतील सर्व विधानसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Irrigation scam allegation baseless says ajit pawar