सिंचनावरून गेली सहा वर्षे आपल्यावर सातत्याने आरोप केले जातात. डॉ. चितळे समितीने आपल्याला क्लिनचिट दिली आहे. कोंबडा झाकून ठेवला तरी पहाटे पाच वाजता तो आरवायचे थांबत नाही, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते अजित पवार यांनी आपण काहीही वेडेवाकडे केले असते तर ते उघड झाले असते, असेच सूचित केले.
स्थैर्य आणि विकासाच्या मुद्दयावर सर्वाधिक जागा मिळालेल्या भाजपला बिनशर्त पाठिंबा देण्याची तयारी राष्ट्रवादीने दर्शविली आहे. याचा अर्थ आम्ही सरकारमध्ये सहभागी होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. आपल्यासह राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवरील आरोपांच्या पाश्र्वभूमीवर चौकशी होऊ नये म्हणूनच भाजपला पाठिंबा देण्याची तयारी दर्शविली का, या प्रश्नावर अजितदादांनी नकारात्मक उत्तर दिले. राष्ट्रवादीवर खोटेनाटे आरोप करण्याची सवयच अनेकांना जडली आहे. हे आरोप कोणीही सिद्ध केलेले नाहीत.
विरोधी पक्षनेतेपदावर दावा
काँग्रेसचे ४२ तर राष्ट्रवादीचे ४१ आमदार निवडून आले आहेत. राष्ट्रवादीने पाठिंबा दिलेले पाच आमदार निवडून आले आहेत. यामुळेच निवडणूकपूर्व आघाडीनुसार आम्हाला ४६ आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे वेळ आल्यास यातूनच राष्ट्रवादी विरोधी पक्षनेते पदावर दावा करेल, असे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विधीमंडळ नेतेपदी निवड
राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी अजित पवार यांची निवड करण्यात आली. आर. आर. पाटील यांची विधानसभा गटनेते तर जयदत्त क्षीरसागर यांची उपनेतेपदी निवड करण्यात आली. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यावर कोणतीच जबाबदारी सोपविण्यात आलेली नाही.