जागावाटपावरून बिघडलेले संबंध टोकाला गेल्यामुळे शिवसेना आणि भाजप एकीकडे स्वबळावर लढण्याचे इशारे देत असतानाच वरळीत मात्र शनिवारी ‘अखंड’ महायुतीचे सूर दणाणले. युती करायची की नाही, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी बनवण्यात आलेल्या महायुतीच्या गाण्याचे चित्रिकरण वरळीत जोरात पार पडले. भगवे फेटे परिधान कलेले, भिल्ल वेशातील आणि गळय़ात ढोल ताशे अडकविलेल्या सुमारे ५० हून अधिक कलाकारांची गर्दी शनिवारी दुपारी वरळी परिसरात सुरू झाली. काही वेळांनी ‘जय महायुती’ अशा घोषणांनी परिसर निनादून निघाला होता. इतक्यात मराठी बाणा आणि संस्कृती दाखविणाऱ्या गाण्याचे बोल कानावर पडत होते. त्याची चौकशी केली असता महायुतीच्या प्रचार गीताचे चित्रिकरण सुरू असल्याचे समजले. कोळीवाडा परिसर, वरळी किल्ला, गोल्फा देवी मार्गावरील संतोषी माता मंदिर या सर्व ठिकाणी हे चित्रिकरण करण्यात आले. रविवारी गाण्याचे पुढील चित्रीकरण अंधेरी येथे होणार आहे. एकीकडे युती तुटण्याच्या मार्गावर असल्याचे बोलले जात असताना महायुतीचे ‘समूहगान’ बघ्यांचे लक्ष वेधून घेत होते. ‘म्हणजे युती होणार तर’ अशी चर्चाही उपस्थितांत सुरू होती. मुंबई : जागावाटपावरून बिघडलेले संबंध टोकाला गेल्यामुळे शिवसेना आणि भाजप एकीकडे स्वबळावर लढण्याचे इशारे देत असतानाच वरळीत मात्र शनिवारी ‘अखंड’ महायुतीचे सूर दणाणले. युती करायची की नाही, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी बनवण्यात आलेल्या महायुतीच्या गाण्याचे चित्रिकरण वरळीत जोरात पार पडले. भगवे फेटे परिधान कलेले, भिल्ल वेशातील आणि गळय़ात ढोल ताशे अडकविलेल्या सुमारे ५० हून अधिक कलाकारांची गर्दी शनिवारी दुपारी वरळी परिसरात सुरू झाली. काही वेळांनी ‘जय महायुती’ अशा घोषणांनी परिसर निनादून निघाला होता. इतक्यात मराठी बाणा आणि संस्कृती दाखविणाऱ्या गाण्याचे बोल कानावर पडत होते. त्याची चौकशी केली असता महायुतीच्या प्रचार गीताचे चित्रिकरण सुरू असल्याचे समजले. कोळीवाडा परिसर, वरळी किल्ला, गोल्फा देवी मार्गावरील संतोषी माता मंदिर या सर्व ठिकाणी हे चित्रिकरण करण्यात आले. रविवारी गाण्याचे पुढील चित्रीकरण अंधेरी येथे होणार आहे. एकीकडे युती तुटण्याच्या मार्गावर असल्याचे बोलले जात असताना महायुतीचे ‘समूहगान’ बघ्यांचे लक्ष वेधून घेत होते. ‘म्हणजे युती होणार तर’ अशी चर्चाही उपस्थितांत सुरू होती.

 

Story img Loader