‘लव्ह जिहाद’ रोखण्यासाठी गरब्याच्या ठिकाणी माझ्या मतदारसंघात मुस्लीम युवकांना प्रवेश देऊ नका, असे वक्तव्य भाजपच्या इंदूर (तीन) येथील आमदार उषा ठाकूर यांनी केले आहे. हिंदू मुलींना प्रेमात फसवून त्यांचे धर्मातर करण्याचे कारस्थान असल्याचा आरोपही ठाकूर यांनी केला आहे. ठाकूर या मध्य प्रदेश भाजपच्या उपाध्यक्षही आहेत. या संदर्भात माझ्या मतदारसंघातील सर्व गरबा आयोजकांना पत्र लिहिणार असल्याचे त्यांनी एक्स्प्रेसशी बोलताना स्पष्ट केले. गरब्याच्या ठिकाणी केवळ हिंदूंना प्रवेश द्यावा यासाठी ओळखपत्र अनिवार्य करावे, अशी सूचनाही ठाकूर यांनी केली आहे. जर मुस्लिमांना यामध्ये सहभाग घ्यायचा असेल तर त्यांनी हिंदू धर्मात प्रवेश करावा, असे ठाकूर यांनी स्पष्ट केले.

Story img Loader