महाराष्ट्राची जनता निवडणुकीत भाजपला पूर्ण बहुमत देईल, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी नागपूरमध्ये व्यक्त केला. त्यामुळे आगामी काळात राज्यात भाजप स्वबळावर सत्तेत येईल असेही त्यांनी सांगितले. शिवसेनेकडून नरेंद्र मोदींवर करण्यात आलेल्या वैयक्तिक टीकेसंदर्भातही त्यांनी यावेळी नाराजी व्यक्त केली. निवडणुकीत ज्या प्रकारच्या भाषेचा वापर होत आहे, ती भाषा महाराष्ट्राच्या संस्कृतीत बसत नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे राज्यातील जनता योग्य तो निर्णय घेईल असे फडणवीस यांनी सांगितले.