शिवसंग्राम संघटनेच्या पाठिंब्यामुळे लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या अनेक उमेदवारांना मराठा समाजाच्या मतांचा फायदा झाला. या पाश्र्वभूमीवर विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांनी छोटय़ा पक्षांचा मानसन्मान ठेवला पाहिजे, अशी अपेक्षा शिवसंग्रमाम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी बुधवारी व्यक्त केली.
शिवसंग्रमाम संघटनेने महायुतीकडे १२ जागांची मागणी केली असून, मराठा समाजाची मते लक्षात घेता आमच्या संघटनेला योग्य प्रतिनिधीत्व मिळावे, अशी अपेक्षा मेटे यांनी व्यक्त केली आहे. जागावाटपाच्या संदर्भात मेटे यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्याशी बुधवारी चर्चा केली. लोकसभेच्या वेळी झालेल्या मदतीची महायुतीच्या नेत्यांनी आठवण ठेवून शिवसंग्रमामसह रिपब्लिकन व अन्य काही छोटय़ा पक्षांना विधानसभेच्या जागावाटपात योग्य प्रमाणात जागा द्याव्यात, अशी मागणी मेटे यांनी केली आहे.
महायुतीच्या नेत्यांकडून सध्या संवादच साधला जात नाही, अशी खंत व्यक्त करीत मेटे यांनी विसंवाद नव्हे तर संवाद वाढला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. मेटे यांना पक्षांतरबंदी कायद्याखाली अपात्र ठरविण्यासाठी राष्ट्रवादीने विधान परिषद सभापतींकडे अर्ज केला आहे. मेटे यांनी विधानसभा लढण्याची तयारी सुरू केली आहे.
महायुतीने छोटय़ा पक्षांचा मानसन्मान ठेवावा – मेटे
शिवसंग्राम संघटनेच्या पाठिंब्यामुळे लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या अनेक उमेदवारांना मराठा समाजाच्या मतांचा फायदा झाला.
First published on: 11-09-2014 at 02:57 IST
मराठीतील सर्व विधानसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahayuti must respect to small alias vinayak mete