गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज (शनिवार) आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर आरोग्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांची मुख्यमंत्रिपदी निवड करण्यात आली आहे. गोव्याचे प्रभारी राजीव प्रताप रुडी यांनी पार्सेकर यांचे मुख्यमंत्रिपदी त्यांचे नाव घोषित केले. गोव्याच्या आमदारांच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्रिपदासाठी प्रामुख्याने तीन नावे पुढे आली होती. यामध्ये आरोग्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, विधानसभा अध्यक्ष राजेंद्र अर्लेकर आणि उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसूझा यांचा समावेश होता. पण, राज्याचे आरोग्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी यामध्ये बाजी मारली.
सकाळी झालेल्या भाजपच्या संसदीय समितीच्या बैठकीनंतर मनोहर पर्रीकरांनी गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. गोवा सोडताना अत्यंत भावूक झालेल्या मनोहर पर्रीकरांनी देश पहिला असं सांगत गोवा सोडून दिल्लीत जाणं खूपच क्लेषदायक असल्याचं सांगितलं. परंतु, देशाची गरज विचारात घेता आपण भाजपा नेतृत्वाच्या आदेशाचे पालन करणार असल्याचे ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा