सायन-पनवेल मार्गावर खारघर येथे सुरू होणाऱ्या टोलनाक्यातून स्थानिकांना वगळण्याचा मागणीवर अद्याप निर्णय न झाल्याने पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांवर दबावतंत्रांचे राजकारण सुरू केले आहे. हा प्रश्न निकाली न निघाल्यास आमदारकीचा राजीनामा देत निवडणूक न लढविण्याचा निर्णय जाहिर केला आहे. निवडणूकीत विकासाचा कोणताही मुद्दा नसल्याने ठाकूर यांची ही धडपड सुरू असल्याची टिका विरोधकांनी केली आहे. निवडणूक काळात टोलनाक्याबद्दल मतदारांची सहानभुती मिळविण्यासाठी रामशेठ यांनी प्रशांत कॉंग्रेसची उमेदवारी घेणार नसल्याचे जाहीर करुन पृथ्वीराज चव्हाण यांच्या संथगतीच्या कारभारावर प्रहार केला.
आणखी वाचा