डोंबिवलीतील कोपर रस्ता भागात राहणारे मनसेचे शाखा अध्यक्ष अरुण जांभळे (३२) यांच्यावर गुरुवारी रात्री सहा जणांच्या टोळीने हल्ला करून त्यांना बेदम मारहाण केली. राजकीय वैमनस्यातून हा हल्ला करण्यात आला आहे, अशी टीका मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. या गुंडांना त्वरित अटक करण्यासाठी मनसेने पोलीस ठाण्यावर मोर्चा आयोजित केला आहे.
दिवा-वसई-पनवेल रेल्वे मार्गावर मध्य रेल्वेने लोकल वाढवाव्यात, लांबच्या गाडय़ांना कोपर स्थानकात थांबा द्यावा, या मागणीसाठी अरुण जांभळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी कोपर रेल्वे स्थानकात सह्य़ांची मोहीम राबवली होती. या मोहिमेला चार हजार नागरिकांनी प्रतिसाद दिला होता.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 08-11-2014 at 03:18 IST
मराठीतील सर्व विधानसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns leader attacked in dombivli