मागील पंधरा वर्षे ज्यांनी महाराष्ट्राच्या सत्तेत राहून राज्याचे वाट्टोळे केले त्या काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्या, मंत्र्यांना भाजपने बहुमतासाठी पक्षात आयात करून त्यांना उमेदवाऱ्या दिल्या. राज्यावर गाढवाचा नांगर फिरवला त्यांच्या जिवावर भाजपवाले सत्ता मिळवणार. अशा आयात उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रभर प्रचारसभा घेत आहेत. काँग्रेस आघाडीची सत्ता गाडण्यासाठी सज्ज असलेल्या जनतेच्या उरावर पुन्हा आघाडीची सत्ता बसवण्यासाठी मोदी प्रयत्नशील आहेत, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी येथील सभेत केली.
शिवसेना, भाजप, काँग्रेस आघाडीच्या अजित पवार, शरद पवार यांचा खरपूस समाचार घेत राज यांनी मागील ५५ वर्षे या लोकांनी राज्याला लुटले. युती, आघाडी यांनी सत्तेसाठी ठरवून तोडल्या, असे सांगत झोपडीतील परप्रांतीयांची घरे विकासक एक कोटीला विकत घेणार. झोपडीधारकांच्या नावाने सरकारी योजना राबवणार. तेथे परप्रांतीयांना घरे. पुन्हा परप्रांतीय तो पैसा आझमगडला पाठवणार. या सगळ्या प्रक्रियेत स्थानिक मराठी बांधव बेघर. सगळा महाराष्ट्र या बिल्डर, कंत्राटदारांच्या ताब्यात गेला आहे. हे सगळे चित्र बदलण्यासाठी फक्त एकदा राज्याची सत्ता द्या असे आवाहन त्यांनी केले.
भाजपकडे स्वबळावर लढण्यासारखे आहेच काय? महाराष्ट्रात तर त्यांच्याकडे सक्षम नेताही नाही. मोदी काय उद्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारालाही येतील.
-राज ठाकरे, डोंबिवली येथील सभेत

Story img Loader