गेली १५ वर्षे सत्तेत भागीदार असलेला राष्ट्रवादी काँग्रेस चौथ्या क्रमांकावर फेकला गेला. त्याच वेळी पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे नामसाधम्र्य असलेला पक्षाच्या चांदिवली मतदारसंघातील उमेदवाराला अनामत रक्कमही वाचविता आली नाही. १० हजारांपेक्षा कमी मते मिळालेले शरद पवार हे पाचव्या क्रमांकावर फेकले गेले. याआधी महापालिका निवडणुकीतही त्यांचा पराभव झाला होता. म्हणजेच या शरद पवार यांच्या पराभवाची मालिकाच सुरू झाली आहे.

Story img Loader