समाजमाध्यम हे एक प्रभावी शस्त्र असल्याने त्याचा अधिकाधिक वापर करावा, मात्र भाजपप्रमाणे विरोधकांवर टीका करण्यासाठी त्याचा वापर करून ते समाजविरोधी माध्यम बनवू नये, असे बिहारचे माजी मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी म्हटले आहे.
समाजमाध्यम हे प्रभावी शस्त्र आहे, मात्र त्याचा गैरवापर धोकादायक आहे, समाजमाध्यमाचा समाजविरोधी वापर करण्याची एकही संधी भाजपने सोडलेली नाही, मात्र आपण त्याचे अनुकरण करणार नाही, असेही नितीशकुमार म्हणाले.
आमचे विचार मांडण्यासाठी समाजमाध्यमांचा आम्ही वापर करू, मात्र कोणाची निंदानालस्ती करण्यासाठी त्याचा वापर केला जाणार नाही. जद(यू)च्या कार्यकर्त्यांसमवेत झालेल्या बैठकांमध्येही समाजमाध्यमांच्या महत्त्वाबाबत चर्चा करण्यात आल्याचे ते म्हणाले. महात्मा गांधी, डॉ. आंबेडकर, राम मनोहर लोहिया, लोकनायक जयप्रकाश नारायण आणि कर्पूरी ठाकूर यांच्या विचारसरणीचे जद(यू)कडून अनुकरण केले जाते त्यामुळे खोटय़ा आश्वासनांवर कधीही राजकारण केले जाणार नाही, असा टोला नितीशकुमार यांनी मोदींना लगावला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा