भाजप नेते  विनोद तावडे यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री होण्यासाठी भाजपमध्ये कोणतीही स्पर्धा नसल्याचे स्पष्ट केले. राज्यात भाजपचा मुख्यमंत्री कोण होणार, या मुद्द्यावरून सध्या महाराष्ट्रात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मात्र, पक्षात अशाप्रकारची कोणतीही स्पर्धा नसल्याचे तावडे यांनी ट्विटरवर सांगितले. कुणीही मागे किंवा पुढे , असा प्रकारच पक्षात अस्तित्वात नसल्याचा दावा तावडे यांनी केला आहे. राज्यातील मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत विनोद तावडे दावेदार मानले जातात. 

Story img Loader