राज्यात कोणत्याच पक्षाला ६० पेक्षा अधिक जागा मिळणार नसल्याचे भाकीत भारिप-बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. भारिप-बहुजन महासंघ राज्यात महाराष्ट्र लोकशाही आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. आघाडीचे १३० उमेदवार विविध ठिकाणी निवडणूक लढवित आहे. आघाडीतील उमेदवारांच्या प्रचारासाठी आंबेडकर यांनी बीडमध्ये जाहीर सभा झाली. त्यानंतर ‘लोकसत्ता डॉट कॉम’शी बोलताना त्यांनी राज्यातील निवडणुकीचे काय निकाल येतील, यावर भाष्य केले.
ते म्हणाले, कॉंग्रेस, राष्ट्रवादी, भाजप किंवा शिवसेना यापैकी कोणत्याच पक्षाला ६० पेक्षा जास्त जागा मिळतील, अशी शक्यता वाटत नाही. एका पक्षाला ९० किंवा १०० जागा मिळतील, असे सांगणारे कुठल्या आधारावर बोलताहेत, हे मला माहिती नाही. या निवडणुकीत आयात केलेल्या उमेदवारांची संख्या ५० टक्के असल्याचे चित्र आहे. एवढे उमेदवार आयात केले जातात, याचाच अर्थ त्या ठिकाणी पक्षाचे संघटन कमकुवत आहे. याचाच परिणाम निवडणुकीच्या निकालांवर होईल.
व्हिडिओ: कोणालाच ६० पेक्षा जास्त जागा मिळणार नाही- प्रकाश आंबेडकर
राज्यात कोणत्याच पक्षाला ६० पेक्षा अधिक जागा मिळणार नसल्याचे भाकीत भारिप-बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
First published on: 10-10-2014 at 02:37 IST
मराठीतील सर्व विधानसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prakash ambedkars prediction for assembly election