माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आर. आर. पाटील यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱयांनी वैध ठरवला. सीमाप्रश्नासंदर्भात बेळगावमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्याचा उल्लेख प्रतिज्ञा पत्रामध्ये न केल्यामुळे आर. आर. पाटील यांचा उमेदवारी अर्ज सोमवारी छाननी प्रक्रियेमध्ये बाजूला काढण्यात आला. मात्र, निवडणून निर्णय अधिकारी हेमंत निकम यांनी तो वैध ठरविला. यामुळे आर. आर. पाटील यांच्या समर्थकांनी फटाके वाजवून त्यांच्या गावामध्ये जल्लोष केला.
आर. आर. पाटील सांगली जिल्ह्यातील तासगाव-कवठेमहांकाळ या विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. बेळगावमध्ये सीमाप्रश्नासंदर्भात दाखल असलेल्या गुन्ह्याचा उल्लेख त्यांनी उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये केलेला नव्हता. यावर या मतदारसंघातील भाजपचे उमेदवार अजित घोरपडे यांनी सोमवारी छाननी प्रक्रियेवेळी आक्षेप घेतला. त्यामुळे आर. आर. पाटील यांचा अर्ज बाजूला काढून ठेवण्यात आला होता.
आर. आर. पाटील यांना दिलासा, उमेदवारी अर्ज वैध
माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आर. आर. पाटील यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱयांनी वैध ठरवला.
आणखी वाचा
First published on: 29-09-2014 at 02:51 IST
मराठीतील सर्व विधानसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: R r patils election application valid