पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात गृहमंत्री राजनाथ सिंग यांचे स्थान दुसऱ्या क्रमांकाचे आहे, असे स्पष्ट झाले आहे. पंतप्रधानांच्या अनुपस्थितीत तातडीच्या कामकाजाचा निपटारा करण्यासाठी जी व्यवस्था करण्यात आली आहे त्याबाबत कॅबिनेट सचिवालयाने जी अधिसूचना जारी केली आहे त्यावरून राजनाथ सिंग दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. आपण २५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत परदेश दौऱ्यावर जाणार असून त्या कालावधीत तातडीची प्रकरणे मार्गी लावण्यासाठी ती राजनाथ सिंग यांच्यापुढे सादर करावीत, असे आदेश मोदी यांनी दिल्याचे कॅबिनेट सचिव अजित सेठ यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

Story img Loader