रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (रिपाई) अध्यक्ष रामदास आठवले यांनी शनिवारी भाजपच्याच गोटात राहण्याचा निर्णय घेतला. भाजपकडून केंद्रात मंत्रिपद, राज्यातील सत्तेत १० टक्के वाटा आणि काही महामंडळे देण्याचे आश्वासन मिळाल्यावर भाजपसोबत जाण्याचा निर्णय आठवले यांनी घेतला. रिपाईच्या समावेशामुळे आता भाजपप्रणित महायुतीत राजू शेट्टी यांचा स्वाभिमानी पक्ष, महादेव जानकर यांचा रासप आणि विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम अशा एकुण पाच पक्षांचा समावेश असणार आहे. भाजपकडून रिपाईला आठ जागा सोडण्यात आल्या आहेत.

Story img Loader