विधानसभा निवडणुकीतील जागावाटपाच्या चर्चेला लवकर सुरुवात करा, आम्हाला दोन आकडी जागा द्या, अन्यथा महायुतीतून बाहेर पडू, स्वबळावर लढू, मग आम्हीही पडू आणि तुम्हालाही पाडू असा इशारा रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी बुधवारी शिवसेना-भाजपला दिला.  
शिवसेना-भाजप यांच्यात जागा वाटपावरुन जो घोळ सुरु आहे, त्याबद्दल रामदास आठवले यांनीही नापसंती व्यक्त केली. रिपब्लिकन पक्ष कोणत्याही परिस्थितीत चार-पाच जागा घेणार नाही. पक्षाला दोन आकडी जागा मिळाल्या पाहिजेत, तसे झाली नाही, तर महायुतीतून बाहेर पडू.
शेट्टीही दोन आकडय़ांवर ठाम
स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी गेल्या दोन दिवसांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन जागावाटपाबाबत चर्चा केली. किमान दहा-बारा जागा मिळाल्या पाहिजेत, असा आग्रह त्यांनी धरला आहे.

Story img Loader