राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना बाळासाहेब देवरस यांनी १९३५ साली केली, असा नवा शोध भाजपचे विरोधी पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांनी येथे पत्रकारांशी बोलताना लावला. संघ ही मातृसंस्था असल्याचे भाजप नेते वारंवार सांगतात. मात्र याच पक्षाच्या नेत्यांना संघाचे संस्थापक कोण आहेत हे माहीत नसावे याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.
डॉ. केशव बळिराम हेडगेवार यांनी १९२५ रोजी संघाची स्थापना केली. मात्र प्रचाराच्या आरोप-प्रत्यारोप काहीही बोला याचा प्रत्यय या निमित्ताने आला. उद्धव ठाकरे आम्हाला हिंदुत्व शिकवणार काय, असा प्रश्न उपस्थित करून आमच्याकडे १९३५ पासून हिंदुत्व असल्याचे वक्तव्य खडसेंनी केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मराठीतील सर्व विधानसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rss founded by balasaheb deoras says eknath khadse