युतीकडे मुख्यमंत्रीपदासाठी एकही उमेदवार नाही. त्यामुळे त्यांच्यातील भांडण हे मुख्यमंत्री पदावरुनच सुरु असल्याचे नारायण राणे म्हणाले.  पुन्हा एकदा महायुतीत जागा वाटपावरुन सुरु असलेल्या वादावर राणेंनी टीका केली आहे. औरंगाबाद येथे एका जाहीर पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
 लोकसभा निवडणुकानंतर मोदी लाट निघून गेली असून आता काँग्रेसचाच विजय होईल असा विश्वासही नारायण राणे यांनी व्यक्त केला आहे. मोदी सरकारने दिलेली आश्वासनं १०० दिवसांत पूर्ण केलेली नाही. मोदी सरकारची ही निष्क्रियता जनतसमोर मांडणार असल्याचे राणेंनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेसला १२४ जागा देण्यास तयार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, राष्ट्रवादीने १४४ पेक्षा एक जागा कमी घेणार नसल्याचे सांगत स्वतंत्र लढण्याचा इशारा राणेंनी दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे भास्कर जाधव यांच्या विरोधात अपक्ष लढण्याचा निर्धार करणारे निलेश राणे लढणार नसल्याचे राणे यांनी सांगितले. मात्र, जाधवांनाही मदत  करणार नसल्याचे राणे म्हणाले.

Story img Loader