उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याणसिंह  यांची राजस्थानच्या राज्यपालपदी करण्यात आलेल्या नियुक्तीचा फेरविचार करावा, अशी विनंती जद(यू)ने राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांना केली आहे. न्यायालयाचा अवमान केल्याचा ठपका असलेल्या व्यक्तीची राज्याचा प्रमुख म्हणून नियुक्ती केल्यास घटनात्मक पेच निर्माण होईल, असे जद(यू)ने म्हटले आहे. केंद्रात सत्तेवर आल्यानंतर विविध राज्यांच्या राज्यपालांना पायउतार होण्यास भाग पाडून भाजपने राज्यपालपदाचा अगोदरच अवमान केला आहे, असेही पक्षाने म्हटले आहे.

Story img Loader