निवडणूक लढविताना जेवढे कम्युनिकेशन असायला हवे, तेवढे मला भाजपमध्ये दिसत नाही. त्याचा फटका निवडणुकीच्या निकालावर होऊ शकतो, अशी शक्यता भाजप महायुतीतील घटक पक्ष शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी व्यक्त केली. मेटे बीड विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवित आहेत. या पार्श्वभूमीवर दिलेल्या मुलाखतीत त्यांनी भाजपतील विसंवादावर बोट ठेवले. भाजपमध्ये तिकीट देताना गटातटाचा वाद झालेला मला दिसला, असे सांगून मेटे यांनी कम्युनिकेशन गॅपमुळे पक्षाच्या जागा कमी होण्याची शक्यता वर्तविली.

Story img Loader