राष्ट्रवादीमधून बाहेर पडून भाजपच्या महायुतीत सामील झालेले शिवसंग्राम पक्षाचे नेते व बीड मतदारसंघातील भाजपचे उमेदवार विनायक मेटे यांचे विधान परिषदेचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे विधान परिषदेत निवडून गेलेले मेटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर व तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीकेची झोड उठवत भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षातर्फे कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. मराठा आरक्षणाच्या निर्णयास राष्ट्रवादी काँग्रेसकडून जाणीवपूर्वक विलंब केला जात असल्याचा आरोपही मेटे यांनी सातत्याने केला होता.  घटनेच्या दहाव्या अनुसूचीतील पक्षांतरबंदी कायद्यानुसार मेटे यांचे सदस्यत्व १३ ऑक्टोबरपासून रद्द करण्यात आल्याचे विधिमंडळ सचिव अनंत कळसे यांनी सांगितले. मेटे यांची विधान परिषद सदस्यत्वाची मुदत ७ जुलै २०१६ रोजी संपणार होती. मात्र, मेटे यांच्या विधानसभेच्या उमेदवारीवर या निर्णयाचा कोणताही परिणाम होणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा