गृहखाते पटकावून गुन्हेगारांना तुरुंगात धाडण्याची महत्वाकांक्षा बाळगलेल्या विनोद तावडे यांना केंद्राच्या धर्तीवर मनुष्यबळ विकास किंवा शिक्षणमंत्री केल्याने ‘आता गुन्हेगारांना तुरुंगात पाठविण्यापेक्षा गुन्हेगार घडू नये, याची जबाबदारी सोपविली असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.  तावडे यांच्याकडे शिक्षणविषयक खात्यांची आणि सांस्कृतिक खात्याचीही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मोदी हे कुशल मनुष्यबळ निर्माण व्हावे  हे उद्दिष्ट घेऊन पावले टाकत आहेत. त्यामुळे मनुष्यबळ विकासच्या धर्तीवर राज्यात पहिल्यांदाच खाते निर्माण करुन ते आपल्याला दिल्याने तावडे यांनी आनंद व्यक्त केला.

Story img Loader