देवळाली आणि नाशिक पूर्व या दोन मतदारसंघातील मनसे उमेदवारांच्या प्रचारार्थ शनिवारी रात्री आयोजित प्रचार सभा निर्धारित वेळेनंतरही सुरू राहिल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरूध्द उपनगर पोलीस ठाण्यात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी सिडको, गंगापूररोड आणि जेलरोड या तीन ठिकाणी राज ठाकरे यांच्या प्रचार सभा झाल्या. सिडको येथील पहिली सभाच निर्धारित वेळेपेक्षा उशीरा सुरू झाल्याने पुढील दोन्ही सभांना उशीर होत गेला. जेलरोड येथील सभास्थानी राज हे दहा वाजेला दोन मिनिटे बाकी असताना पोहोचले. लगेचच त्यांनी भाषणास सुरूवात केली. सुमारे २५ मिनिटे त्यांचे भाषण सुरू होते. आदर्श आचारसंहितेनुसार रात्री दहा वाजेपर्यंत भाषण संपविणे आवश्यक होते. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी नीलेश जाधव यांनी ठाकरे यांच्याविरूध्द उपनगर पोलीस ठाण्यात आचारसंहिता भंगाची तक्रार दिली. त्यानंतर गुन्हा दाखल झाला.
राज ठाकरे यांच्याविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
देवळाली आणि नाशिक पूर्व या दोन मतदारसंघातील मनसे उमेदवारांच्या प्रचारार्थ शनिवारी रात्री आयोजित प्रचार सभा निर्धारित वेळेनंतरही सुरू राहिल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरूध्द उपनगर पोलीस ठाण्यात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
First published on: 13-10-2014 at 02:02 IST
मराठीतील सर्व विधानसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Violation of code of conduct case against raj thackeray