लिंगायत समाजाच्या मतदारांना आकृष्ट करण्यासाठी भाजपने नामी युक्ती शोधत भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांच्या उदगीर, देवणी व लातूर येथे सभा घेतल्या. या तिन्ही ठिकाणी त्यांनी कन्नड भाषेतून मतदारांना भाजपला साथ देऊन भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र निर्माण करण्याचे आवाहन केले.
येडीयुरप्पा यांच्यासमवेत कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टार, विरोधी पक्षनेते के. एस. ईश्वरप्पा यांचीही भाषणे झाली. कर्नाटक सीमेलगतच्या लातूर जिल्ह्य़ात िलगायत समाजाची मते निर्णायक ठरणारी आहेत. गेल्या ३० वर्षांतील निवडणूक प्रचारात भाजपने प्रथमच हा प्रयोग केला. कर्नाटकातील भाजपचे मातब्बर कार्यकत्रे गेल्या १५ दिवसांपासून लातूर जिल्हय़ात प्रचारात व्यस्त आहेत. येडीयुरप्पा यांचे िलगायत समाजात आकर्षण आहे, हे लक्षात घेऊनच भाजपने ही खेळी केली. येडीयुरप्पांच्या सभांना प्रतिसादही चांगला मिळाला. त्यांनी आघाडी सरकारने घोटाळे केल्याचा आरोप केला आणि भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र हे भाजपचे स्वप्न असल्याचे सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा