‘ग्रीनपीस’ या संघटनेने अलीकडेच सादर केलेला हवा प्रदूषणाबाबतचा अहवाल भारतासाठी निराशाजनक आहे. याचे कारण म्हणजे जगातील ३० सर्वाधिक प्रदूषित शहरांत भारतातील २२ शहरे आहेत. यातही जगातील राजधान्यांमध्ये दिल्लीचा पहिला क्रमांक आहे. चीनने प्रदूषणाची पातळी कमी करण्यात बरेचसे यश मिळवले असले तरी ज्या तीन हजार शहरांमध्ये प्रदूषणाचे हे मापन करण्यात आले आहे त्यात चीनचीही अनेक शहरे आहेत. फक्त ती वेगवेगळ्या क्रमांकांवर आहेत. दिल्लीप्रमाणेच बीजिंगमध्येही हवा प्रदूषणाचा प्रश्न गंभीर होता, पण त्यावर चीनने मात केली आहे असे यातून दिसते आहे. ‘ग्रीन पीस अँड एअर व्हिज्युअल अ‍ॅनॅलिसिस ऑफ पोल्यूशन’ अहवालात तीन हजार शहरांचा अभ्यास करण्यात आला, त्यात ६४ टक्के शहरांनी जागतिक आरोग्य संघटनेने ठरवून दिलेली पीएम २.५ कणांची पातळी ओलांडल्याचे दिसत आहे.

गुरुग्राम पहिल्या क्रमांकावर

tension over POP ganesh idol immersion continues
पीओपी मूर्ती विसर्जनाचा तिढा कायम, कृत्रिम तलावात विसर्जन करण्याचा पर्याय
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Mumbai municipal corporation
विश्लेषण : देशातल्या सर्वांत श्रीमंत महापालिकेला घरघर? मुंबई महानगरपालिकेच्या घटलेल्या मुदतठेवी चिंतेची बाब का?
592 crores assistance to those affected by natural disasters
नैसर्गिक आपत्ती बाधितांना ५९२ कोटींची मदत, राज्यातील ५.४० लाख शेतकऱ्यांना दिलासा
nashik water news marathi
नाशिक जिल्ह्यात ३५७ गावांत वैयक्तिक विहिरी, विंधनविहिरींवर बंदी; १५ पाणलोट क्षेत्रात भूजलाचा बेसुमार उपसा
air pollution issue ignore in in delhi assembly elections
‘शुद्ध हवा’ नावडे दिल्लीकरांना…
शिवाजी पार्क मैदानात धूळ नियंत्रणासाठी गवताची लागवड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे आदेश
Ambuja Cements Maratha Limestone mine in Lakhmapur Korpana taluka will cause severe pollution affecting nearby villages
चंद्रपूर : अंबुजा सिमेंटच्या लाईमस्टोन खाणीमुळे प्रदूषणात वाढ; दहा ते पंधरा गावांना…

गुरुग्राम हे दिल्लीजवळचे शहर सर्वात प्रदूषित ठरले आहे. याची काही कारणे आहेत. माहिती तंत्रज्ञान व इतर संस्थांची कार्यालये तेथे आहेत, त्यामुळे बांधकामांचे प्रमाण जास्त आहे. त्यातून उडणारी धूळ हे एक कारण आहे. उबर व ट्रिप अ‍ॅडव्हायजर या खासगी वाहतूक संस्थांची कार्यालये तेथे आहेत. गुरगावमधील पीएम २.५ कणांचे प्रमाण प्रति घनमीटरला १३५ मायक्रोग्रॅम आहे. दिल्ली राजधान्यांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. याचे कारण जुनी वाहने, मोटारींची जास्त संख्या, पिकांचे अवशेष जाळणे, बांधकामांवेळची धूळ ही आहेत.

भारतातील पहिल्या तिसातील शहरे

गुरुग्राम (१), गाझियाबाद (२), फरीदाबाद (४), भिवंडी (५), नोईडा (६), पाटणा (७), लखनौ (९), दिल्ली (११), जोधपूर (१२), वाराणसी (१४), मोरादाबाद (१५), आग्रा (१६), गया (१८), जिंद (२०), कानपूर (२१), सिंगरोली (२२), कोलकाता (२३), पाली (२४), रोहतक (२५), अहमदाबाद (२९), जयपूर (३७), असनसोल (४४), हावडा (४५), अमृतसर (५७), मुंबई (७१), मंदादीप (७५), तलचर (७६), उदयपूर (९४), लुधियाना (९५), अजमेर (१०१), उज्जन (१०३), विशाखापट्टनम (११२), अल्वर (११४), कोटा (११५), औरंगाबाद (१४२), देवास (१३८) अशी क्रमवारी यात दिसते.

पीएम २.५ कण म्हणजे काय?

पीएम २.५ कण याचा अर्थ २.५ मायक्रॉन आकाराचे सूक्ष्म प्रदूषक क ण. ते हवेत तरंगत सहजपणे श्वासातून माणसाच्या शरीरात जातात. त्यांचा आकार हा केसाच्या रुंदीपेक्षा चाळिसाव्या भागाइतका सूक्ष्म असतो. हे कण ओझोन, नायट्रोजन ऑक्साइड, कार्बन डायॉक्साइड, सल्फर डायॉक्साइड, नायट्रेट, धूळ यांचे असतात. यामुळे फुप्फुसाचे कार्य बिघडते. हृदयविकार, श्वसनाचे विकार जडतात, बोधनक्षमता कमी होते. दक्षिण आशियातील ९९ टक्के, तर पूर्व आशियातील ८९ टक्के शहरांनी जागतिक आरोग्य संघटनेने ठरवून दिलेली या कणांची सुरक्षित पातळी केव्हाच ओलांडली आहे.

निकष काय?

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते पीएम २.५ (पार्टिक्युलेट मॅटर) कणांचे प्रमाण वार्षिक पातळीवर एका घनमीटरला १० मायक्रोग्रॅमपेक्षा अधिक नसावे. वर्षांच्या आकडेवारीतील सरासरीत २५ मायक्रोग्रॅमपेक्षा अधिक नसावे. पीएम दहा कणांचे प्रमाण वार्षिक २० मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटर व २४ तासांच्या काळात ५० मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटरपेक्षा जास्त नसावे, पण ही आकडेवारी आदर्शाच्या पातळीवरील आहे. इतके कमी प्रमाण फार थोडय़ा ठिकाणी असेल.  संवेदनशील गटांसाठी अनारोग्यकारक १०१-१५०, सर्वानाच अनारोग्यकारक १५१-२००, खूपच अनारोग्यकारक २०१-३००, घातक ३०१-५०० अशी पीएम २.५ कणांच्या प्रमाणाची धोक्याप्रमाणे वर्गवारी आहे. यातही एक तासासाठी ते प्रमाण किती असेल तर धोकादायक, याची वर्गवारी वेगळी आहे.

उपाय काय?

  • जीवाश्म इंधनांचा वापर कमी करणे
  • प्रदूषणकारी तंत्रज्ञानाचा वापर टाळणे
  • जुनी वाहने वापरातून बाद करणे
  • पिकांचे अवशेष जाळण्याला पर्याय उपलब्ध करून देणे
  • सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करणे
  • एन ९९ व एन ९५ मास्क वापरले तर पीएम २.५ सह सर्व कणांचा बंदोबस्त करता येतो, पण तो शाश्वत उपाय नाही.
  • हवा शुद्धीकारक यंत्रांचा (एअर फिल्टर) व्यवसायही आता दिल्लीतील प्रदूषणामुळे वाढला आहे.

आर्थिक फटका

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते जगात दरवर्षी प्रदूषणाने ७० लाख लोक हवा प्रदूषणाने अकाली मरतात. जागतिक बँकेच्या अंदाजानुसार त्याचा जागतिक अर्थव्यवस्थेला २२५ अब्ज डॉलर्सचा फटका बसत असतो.

कशाचा आधार पाहणीत घेतला

हवेचा दर्जा ठरवण्यासाठी सार्वजनिक निरीक्षण यंत्रणा, सरकारी मापन यंत्रणा, एअर व्हिज्युअल मॉनिटर्स यांचा वापर करण्यात आला असून त्यात व्यक्ती व संस्थांनी माहिती गोळा करण्याचे काम केले आहे. या पाहणीचा नमुना आकार मोठा आहे. भारतातील उत्तरेकडची शहरे जास्त प्रदूषित असल्याचे यात दिसून आले आहे. शिवाय यात पक्षपातही म्हणता येणार नाही, कारण चीनची बरीच शहरे यात आहेत. इतरही देशांतील शहरांचा समावेश आहे.

संकलन : राजेंद्र येवलेकर

Story img Loader