खासदारांचा सातबारा
लोकसभेच्या निवडणुकांचे ढोल-ताशे वाजण्यास सुरुवात झाली आहे. आणखी काही महिन्यांतच आपले
‘तडफदार आणि लाडके’ उमेदवार मतांचे दान मागण्यासाठी मतदारराजाच्या दारी
येतील. अशा वेळी गेल्या निवडणुकीत आपण ज्यांना निवडून दिले त्यांनी लोकांसाठी नेमके काय केले? पाच वर्षांत विकासाची कोणती कामे केली? किती निधी खर्च केला? त्यांच्याबद्दल मतदारांचे, विरोधकांचे काय म्हणणे आहे? याची पक्की नोंद दर रविवारी.. खासदारांचा
सातबारा मध्ये..
प्रकाश आंबेडकर यांची भूमिका निर्णायक
भाजपचे संजय धोत्रे हे खासदार असल्याचा टेंभा न मिरवणारे आणि साधे वागणारे असा त्यांचा लौकिक. ग्रामीण भागातील मतदारांच्या भरवशावर आपला विजय अवलंबून आहे याची जाण असल्याने ते प्रत्येकाच्या संपर्कात असतात. भाजप, काँग्रेस आणि भारिप अशी लढत येथे कायमच होत आली आहे. त्याचा लाभ भाजपला होतो. २००४ आणि २००९ या दोन्ही सार्वत्रिक निवडणुकांच्या वेळी काँग्रेसने प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर आघाडी करण्याची तयारी दर्शविली होती, पण आंबेडकर हे आघाडीऐवजी स्वबळावर लढण्यावर आग्रही राहिले आणि त्याचा फायदा भाजपला झाला. अकोला जिल्ह्य़ात काँग्रेसची संघटनात्मक अवस्था फारच कमकुवत झाली आहे. जिल्ह्य़ातून पक्षाचा एकही आमदार निवडून येऊ शकला नाही. याउलट प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाचे दोन आमदार आहेत. जिल्ह्य़ात भाजपचे संघटन चांगले आहे. अकोला महानगरपालिकेच्या सत्तासंपादनासाठी काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर हे एकत्र आले. याचीच पुनरावृत्ती लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये व्हावी, अशी दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची प्रबळ इच्छा आहे. आंबेडकर कोणती भूमिका घेतात यावरच या मतदारसंघातील निवडणुकीचे गणित अवलंबून आहे. आंबेडकर आणि काँग्रेस एकत्र आल्यास भाजपपुढे मोठे आव्हान उभे राहू शकते. तिरंगी लढत झाल्यास त्याचा पुन्हा भाजपलाच फायदा होण्याची चिन्हे आहेत. यामुळेच राज्यात केवळ अकोला जिल्ह्य़ात चांगली ताकद असलेल्या प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेवर सर्वाच्या नजरा लागल्या आहेत. आंबेडकर यांनी मात्र आपले पत्ते अद्याप खुले केले नाहीत.
लोकसभा मतदारसंघ : अकोला
विद्यमान खासदार : संजय धोत्रे, भाजप
मागील निकाल : भारिप -बमसंचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांचा पराभव
जनसंपर्क
रणपिसेनगरमधील घर आणि भाजपचे कार्यालय येथे जनसंपर्क कार्यालय. तेथे अनेकांना ते सहज भेटू शकतात. जास्तीत जास्त वेळ मतदारसंघात राहून जनसंपर्कावर भर.
रस्ते व जलसंधारणाला प्राधान्य
सर्व भागांत उत्तम रस्त्यांचे जाळे तयार व्हावे व त्या रस्त्यांचा दर्जा उत्कृष्ट राहावा यालाच आपल्या कार्यकाळात मुख्य प्राधान्य राहिले आहे. जलसंधारणालासुद्धा विशेष प्राधान्य आहे. रस्ते आणि पाणी हे तर महत्त्वाचे. ग्रामीण भाग शहराशी जोडला जाणे ग्रामीण विकासासाठी गरजेचे आहे. वाहतुकीची साधने वाढल्यामुळे रस्त्यांचे जाळे विस्तारणे आवश्यक आहे.
खासदार संजय धोत्रे
मतदारसंघातील कामगिरी :
*अकोला राष्ट्रीय महामार्ग
क्र. ६ चे १०० कोटींचे काम पूर्ण.
*बाभूळगाव येथे नवोदय विद्यालयाची निर्मिती.
*मूर्तिजापूर ग्रामीण व शहरी भागाच्या पाणीपुरवठय़ासाठी दोन बॅरेज प्रकल्पांची निर्मिती.
*नेरधामणा प्रकल्पाला निधी
उपलब्ध करून दिला.
*सवरेपचार रुग्णालयात गरीब
रुग्णांसाठी ३० कोटींचा निधी.
*खासदार निधी विकासकामांसाठी खर्च करणारे राज्यात प्रथम, तर देशात दुसरे.
लोकसभेतील कामगिरी
*सभागृहात उपस्थित केलेले प्रश्न : ३२९ (तारांकित २९, अतारांकित ३००) ’एकूण १६ वेळा चर्चेत सहभाग
*एकूण हजेरी – २४८ दिवस (३१९ पैकी)
लोकसभेत मांडलेले महत्त्वाचे प्रश्न :
*रत्नागिरीतील खेड येथील पूल रुंद करण्याबाबत चर्चा.
*विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या प्रश्नावर चर्चा.
*अर्थसंकल्प तसेच रेल्वे अंदाजपत्रकावरील चर्चेत भाग.
*नांदेड-मुंबई तपोवन एक्स्प्रेस आदिलाबाद-नागपूपर्यंत नेण्याची मागणी.
*गंगा नदी आणि हिमालय पर्वतरांगांसमोर निर्माण झालेली आव्हाने यावर चर्चेत सहभाग.
विकासाचा दृष्टिकोन दिसलाच नाही
अकोला शहरात बऱ्याच जिनिंग प्रेसिंग आहेत, पण अनेक जिनिंग बंद पडल्या आहेत. वस्तुत: या कापूसपट्टय़ासाठी ‘टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन मिशन’ (टफ) या केंद्रीय संस्थेकडून १०० टक्के अर्थसाहाय्य मिळते, पण विद्यमान खासदारांकडून याबाबत प्रयत्नच झाले नाहीत. पंतप्रधान पॅकेजचासुद्धा लाभ मिळाला नाही. शहर विकासात बाधा आणण्याचा प्रयत्न विद्यमान खासदार करीत आहेत. त्यांच्या कामात विकासाचा दृष्टिकोन दिसला नाही. – प्रकाश आंबेडकर
पुढील रविवारी
सातारा, रामटेक