कामशास्त्राच्या देशात कामुकस्थळांवरील बंदी घातली जाते आणि त्याच वेळी ती पाहण्यात हा देश आघाडीवर असतो.. काय आहे हा सांस्कृतिक तिढा? अशी बंदी खरोखरच योग्य आणि नैतिक आहे? पोर्न व्यवहाराच्या विविध बाजूंवर एक दृष्टिक्षेप..
केंद्र सरकारने पोर्नबंदीचा कायदा करायचा म्हटल्यावर त्याबद्दल विविध उलटसुलट चर्चा वाचनात आल्या. त्यांचा प्रतिवाद करणं गरजेचं आहे. पोर्नबद्दल असणारे नेमके आक्षेप काय आहेत? तर –
१. पोर्नचं व्यसन लागतं.
२. ते पाहिल्यामुळे मनुष्य हाडामांसाच्या, प्रत्यक्ष व्यक्तीसोबत संभोग करू शकत नाही.
३. त्यात दाखवलेला संभोग बहुतांशी अनसíगक असतो.
४. प्रौढांवर चित्रित झालेलं पोर्न बघून वासना पूर्ण होत नाहीत म्हणून लहान मुलांना वापरून बनवलेलं पोर्न बघतात.
५. पोर्नमुळे बलात्कार वाढतात.
लहान मुलांशी संभोग, बलात्कार या गोष्टी बेकायदेशीर आणि अयोग्य आहेत. असे हीन प्रकार घडू नयेत. लहान मुलांशी संभोग दाखवणारं बालक-पोर्न बहुतांश देशांत बेकायदेशीर आहे. बहुतेक देशांमध्ये खऱ्या बलात्काराचं चित्रण करून प्रसारित करणं आणि/किंवा असं चित्रण बाळगणं हे गुन्हे आहेत. मात्र पोर्नचं व्यसन लागण्याची परिणती बालक-पोर्न बघण्यात होते हा गरसमज आहे. बालकांशी संभोग करणारे आणि पोर्न बघणारे हे संपूर्णपणे वेगळे गट आहेत. भीती पसरवण्यासाठी संस्कृतिरक्षक आणि पोर्नविरोधक बालकांचा गरवापर करून घेतात.
पोर्नचा वापर मुख्यत्वे तीन कारणांसाठी होतो- स्वत: स्वत:ला कामसुख मिळवून देण्यात मदत देण्याच्या शुद्ध हेतूसाठी (हस्तमैथून), लंगिक स्वप्नरंजन प्रत्यक्षात होताना बघणे, नात्यातली जवळीक टाळणे यासाठी. लंगिक प्रतिमा बघून पुरुषांना स्त्रियांपेक्षा अधिक प्रमाणात कामसुख मिळतं; अनेक स्त्रियासुद्धा पोर्न बघून स्वत:पुरतं कामसुख मिळवतात. स्त्री-पुरुष, मनुष्याचं हे वर्तन नसíगक आहे. मी पोर्न पाहते हे सांगण्यात काहीही अपराध नाही. सुधारलेला आहार, जीवनपद्धती यांमुळे वयात येण्याचं वय बरंच कमी झालेलं आहे. पौगंडावस्थेतल्या मुलामुलींनी तेरा-चौदाव्या वर्षी प्रत्यक्ष संभोग करणं अपेक्षित नाही, पण जागृत झालेली लंगिकता आतून धडका देत असते. विविध कारणांमुळे लग्न किंवा तत्सम नात्यांचं बंधन नाकारणारे लोक समाजात असतात, त्यांच्या शारीरिक गरजा असतात. लग्न केलेल्या किंवा नात्यात बांधून घेतलेल्या लोकांचे जोडीदार असतात. पण नात्यातल्या दोघांना (किंवा अधिक) एकाच वेळी कामेच्छा होईल याची खात्री नाही. या सगळ्यांसाठी हस्तमथुन हा मानसिक आरोग्य आणि निकोप नाती जपण्याचा राजमार्ग आहे. पोर्न बघून यातल्या अनेकांना लंगिक सुख मिळतं. कधी कधी लग्नाचे जोडीदारही एकत्रित उत्तेजनासाठी पोर्न वापरतात.
संभोग कसा करावा हे ज्यांनी अमेरिकेला शिकवलं ते मास्टर्स आणि जॉन्सन हे संशोधक नोंदवतात की, स्त्री-पुरुषांच्या निरनिराळ्या लंगिक ‘फँटसी’ असतात. अशा कोणत्याही प्रकारचं स्वप्नरंजन करणं नसíगक आहे; यातली काही स्वप्नं प्रत्यक्षात आपल्यासोबत घडावीत असंसुद्धा अनेकांना वाटत नाही. काही स्वप्नं प्रत्यक्षात घडवून आणता येत नाहीत. अशा अनेक लोकांचं स्वप्नरंजन पोर्नमधून होतं. मास्टर्स आणि जॉन्सन आपल्या पुस्तकात लिहितात : सगळ्यांना लागू पडेल अशी एकच एक लंगिक मूल्यव्यवस्था आणि वैश्विक पातळीवर ग्राह्य़ ठरणारी नतिकता अस्तित्वात नाही. पोर्नचं व्यसन लागतं, हा पोर्नविरोधकांचा आवडता गरसमज आहे. व्यसन या शब्दाचाच तो गरवापर आहे. व्यसन म्हटलं की आपल्यासमोर दारू, गर्दचं व्यसन लागून आयुष्य उद्ध्वस्त झालेले लोक येतात. तसे पोर्नच्या आहारी गेलेले किती लोक आपल्याला माहीत असतात? या प्राथमिक चाचणीनुसारच हे प्रमाण किती कमी असेल याचा अंदाज घेता येतो. सेक्सॉलॉजीमध्ये संशोधन करणाऱ्या लोकांमध्ये पोर्नच्या सवयीला व्यसन म्हणावं की अनिवार्यता याबद्दल मतभेद आहेत. सध्या सोयीसाठी आपण ‘व्यसन’ हा शब्द स्वीकारूया. पोर्नचं ‘व्यसन’ म्हणजे नक्की काय? ते व्यसन असल्याची नोंद मानसिक विकारांच्या यादीत नाही. पोर्नचं अतिअनिवार्य आकर्षण असणाऱ्या व्यक्ती जरूर असतात. आपल्याला पोर्नचं व्यसन लागलेलं आहे असा काही लोकांचा दावा असतो. पण बहुतेक संशोधकांच्या मते हे सगळं ‘नीम हकीम’ पद्धतीने ठरवलेलं असतं.
अमेरिकेत पोर्नोग्राफीचा प्रसार कसा झाला आणि त्याला स्त्रीवाद्यांनी केलेला विरोध याबद्दल अभ्यास करताना एक गोष्ट लक्षात आली. १९७०च्या दशकातच स्त्रीवाद्यांनी पोर्नविरोधात आंदोलनं सुरू केली. त्याला काही प्रमाणात यश आलं. पण १९८०च्या दशकात व्हिडीओ कॅसेट्स आल्यानंतर पॉर्न चित्रपटांचा प्रसार रोखणं अशक्य झालं. १९९० नंतर इंटरनेटमुळे पोर्न कित्येकांना सुलभरीत्या उपलब्ध झालं. १९७३ ते ८० या काळात तिथे होणाऱ्या बलात्कारांचं प्रमाण बदललं नव्हतं. १९८०च्या दशकात ते कमी व्हायला लागलं, १९९०च्या पुढे बलात्कारांचं प्रमाण कमी होण्याचा वेग बराच वाढला. १९९० सालाच्या प्रमाणापेक्षा हा आकडा २०१३ सालात अध्र्यावर आलेला आहे. अर्थातच, पोर्नमुळे बलात्कार घटले असं म्हणणं हा दूधखुळेपणा आहे. मग नक्की काय झालं?
अमेरिकेत गेल्या काही दशकांमध्ये सरकारी धोरणं, भांडवलशाहीचा प्रसार, सुबत्ता, स्त्रीवादी आणि उदारमतवादी विचारांचा प्रसार यांच्यामुळे स्त्रियांची आत्मनिर्भरता, आत्मविश्वास वाढला. लंगिक शिक्षण, सामाजिक परिस्थितीमधले बदल यांच्यामुळे पुरुषांनी स्त्रियांकडे भोगवस्तू, दुय्यम व्यक्ती अशा प्रकारे न बघता आपल्यासारखीच एक व्यक्ती म्हणून बघायला सुरुवात झाली. १९७०-८०च्या दशकांत दुसऱ्या पिढीतल्या अमेरिकन स्त्रीवाद्यांचं म्हणणं होतं, ‘‘आम्ही घरात आणि घराबाहेर सुरक्षित नाही. अशा वेळेस पोर्न बघूनही आमच्या मनांत भीती उत्पन्न होते. त्यामुळे पोर्नवर अंकुश आणला पाहिजे.’’ तेव्हाच्या तुलनेत आज स्त्रिया बऱ्याच जास्त सुरक्षित आहेत. त्यामुळे पोर्नमुळे किळस वाटणं, भीती वाटणं हे प्रकार बरेच कमी झालेले आहेत; उलट स्त्रियांसाठी वेगळं पोर्न बनायला कमी प्रमाणात का होईना, सुरुवात झालेली दिसते. १९७०-८०च्या दशकांत अमेरिकेत जी परिस्थिती असल्याचं लिहिलं गेलं तशीच काहीशी परिस्थिती आज भारतात दिसते. रात्री उशिरापर्यंत बाहेर राहणं स्त्रियांना धोकादायक वाटतं. रोडरोमियोंच्या शिटय़ा, अश्लील बोलणं, अंगचटीला येणं ते बलात्कार अशा अनेक प्रकारच्या लंगिक अत्याचाराला आज भारतीय स्त्रियांना तोंड द्यावं लागत आहे. एका स्त्रीला असा त्रास झाला की त्यातून आणखी दहा स्त्रियांना यांची भीती वाटते. खरोखर घडणाऱ्या अत्याचारांच्या भीतीमध्ये भर पडते ती पोर्नसारख्या बागुलबुवाची. त्याला जोड मिळते धार्मिक आणि नतिकतेचं रक्षण करू पाहणाऱ्या संस्कृतिरक्षकांची. पोर्नवर बंदी आणण्याचा विचार करणं हे या प्रत्यक्ष घडणाऱ्या गुन्ह्य़ांबाबत काही करू शकता न येण्याची हतबलता आहे. स्त्रियांचं सक्षमीकरण करणं, पुरुषांना समानतेचे धडे देणं, लहान मुलांना योग्य वयात लंगिक शिक्षण देऊन सुजाण नागरिक बनवणं या गोष्टी चुटकीसरशी होत नाहीत. लंगिकतेबद्दल उघड चर्चा करण्याची पद्धत आज तरी आपल्या समाजात रूढ नाही. त्यात पोर्न म्हणजे चोरून, एकेकटय़ा व्यक्तीने बघण्याची नतिक गोष्ट. काही तरी केल्याचा आव आणण्यासाठी पोर्नलाच गुन्हेगार मानून झोडणं सोपं आहे. संस्कृतिरक्षक धार्मिकांची आणि घाबरलेल्या समाजगटाची त्याला जोड मिळते.उत्तम वैज्ञानिक माहितीच्या कोंदणात मांडलेले विचार म्हणजे मौल्यवान हिरा असल्याचा भास होणं सहज शक्य आहे. मात्र अशा मांडणीमुळे कचकडय़ाच्या विचारांनीही दिशाभूल करता येते. पोर्नविरोधक तशी ती करीत असतात, परंतु ती धोकादायक असते, कारण त्यामुळे मूळ प्रश्नाकडे दुर्लक्ष होते. मूळ प्रश्न असा आहे, की स्त्रियांसाठी खरोखर भीतिदायक असणाऱ्या, प्रत्यक्षात घडणाऱ्या लंगिक गुन्ह्य़ांचं प्रमाण कोण कमी करणार?
संहिता जोशी (sanhita.joshi@gmail.com) ,
सहलेखन – राजेश घासकडवी (ghaski@gmail.com)
सर्व सर्व्हेचे म्हणणे!
विविध संस्था, आघाडीची साप्ताहिके, वृत्तपत्रे आणि संकेतस्थळांना वार्षिक सर्वेक्षणाचा टोकाचा धक्का देण्यात पटाईत आहेत. गेली दहा-बारा वर्षे इंडिया टुडे साप्ताहिक आवर्जून भारतीय कामव्यवहाराचे बदलते चित्र मांडून धक्का देण्यात आघाडी घेत आहे. सर्वच सर्वेक्षणाची आकडेवारी टोकाची वाटणारी आणि ‘भारतातील इंडिया’ व ‘इंडियातील भारत’ या संकल्पनेतील भेदभाव नष्ट करणारी आहे.
महिलांची आघाडी
यावर्षी अमेरिकी वृत्त संकेतस्थळ डेली बिस्ट यांच्या सहकार्याने पोर्न हब, रेड टय़ूब या संकेतस्थळांनी विशेष सॉफ्टवेअर प्रणालीचा वापर करून जगभरातील संगणक वापरणारांची लिंगाधारित आकडेवारी गोळा केली.
भारतातील ३० टक्के महिला पोर्न पाहतात. (अमेरिकेतील २३ टक्के महिला पोर्न पाहतात.) अर्जेंटिना आणि भारतातील महिला समलिंगी पोर्न पाहण्यात स्वारस्य दाखवत असल्याचेही हे सर्वेक्षण सांगते.
फिलिपाइन्समधील महिला सर्वात जास्त (३५ टक्के) पोर्न पाहत असल्याचे संकेतस्थळांना दिसले. गेल्या वर्षी मुंबईतील पोद्दार शिक्षण संस्थेने पुणे, नाशिक, बंगळुरू, मुंबई, नवी मुंबई आणि अहमदाबाद येथे केलेल्या सर्वेक्षणानुसार ४९ टक्के मुली-महिला कामज्ञान मिळविण्यासाठी पोर्न पाहतात, तर ४४ टक्के मुली ‘मिल्स अॅण्ड बून’ वा तत्सम पिवळ्या पुस्तकांद्वारे कामव्यवहार जाणून घेतात.
कामशास्त्राच्या देशात..
दर ८ मिनिटांनी १ व्यक्ती कामुकस्थळांस भेट देते. हिमाचल सर्वात कमी कामुकस्थळांस भेट देणारे राज्य.
४९.९ टक्के लोक मोबाइलद्वारे, ४७.५ टक्के लोक डेस्कटॉपवर, २.६ टक्के लोक टॅबद्वारे या संकेतस्थळांना भेट देतात.
भारतातून या संकेतस्थळांना सर्वाधिक हिट्स शनिवारी मिळतात अन् ब्रिटन, अमेरिका, जर्मनी आणि ब्राझिलमध्ये सोमवारी.
कुठे पोर्नबंदी आहे?
बांगलादेश, पाकिस्तान, इंडोनेशिया, इजिप्त, सुदान, दक्षिण कोरिया, सिंगापूर, अरब राष्ट्रे, युक्रेन. (बांगलादेशात पोर्न पाहणाऱ्यास १० वर्षे तुरुंगवास किंवा ५ लाख टका दंड. सिंगापूरमध्येही बंदीचे उल्लंघन केल्यास तीन वर्षे तुरुंगवास वा १० लाख हाँगकाँग डॉलर्स दंड.)
बंदी आहे, पण पाळतो कोण?
द. अमेरिका, चीन येथेही बंदी आहे.
पण चीनमध्ये लोक बाहेरील देशांच्या सव्र्हरवरून पाहतात. अन्यत्र कोणी बदी पाळतच नाही.
र्निबध आहेत, पण बंदी नाही..
अमेरिका- संघराज्य पातळीवर बंदी नाही. ब्रिटन- केवळ बिभत्स, विकृत (फेटिश) पोर्नवर बंदी.
फ्रान्स – एक्स दर्जाच्या फिल्मवर ३३ टक्के व्हॅट. ऑनलाइन पॉर्नोग्राफीवर ५० टक्के अबकारी कर.
जर्मनी- हार्डकोअरवर बंदी. सॉफ्टकोअरबाबत कायदे शिथिल.
ऑस्ट्रेलिया – पोर्नोग्राफीला परवानगी आहे, पण विकणे, प्रदर्शन करणे यावर र्निबध.
रशिया- कायदेशीर भूमिका अस्पष्ट.
न्यूझीलंड- कायदेशीर परवानगी आहे. विकृत पोर्नला विरोध.
कॅनडा, हंगेरी, इटली,
द. आफ्रिका – १८ वर्षांपुढील नागरिकांना पाहण्याची परवानगी.