साधारण २०१२ पासून, त्या वेळी पंतप्रधान पदावर असलेले मनमोहन सिंग हे कसे कचखाऊ आहेत, त्यांचे सरकार कसे भ्रष्टाचारी आहे आणि या भ्रष्ट सरकारमुळेच महागाई कशी वाढते आहे, देश गाळात जातो आहे आदी प्रचार सुरू झाला होता. सिंग यांनी त्यावर कोणतेही मतप्रदर्शन केले नाही- ते त्यांच्या स्वभावातही नव्हते. ‘मी काम करण्यासाठी या पदावर आलो आणि ते काम मी करणार’ एवढाच त्यांचा बाणा होता. मुळात मुखदुर्बळ म्हणावेत असे डॉ. सिंग, त्यांच्या पंतप्रधान- पदाच्या अखेरच्या दोन वर्षांत अधिकच अबोल झाले होते. त्यात तत्कालीन अर्थमंत्री प्रणब मुखर्जी आणि संरक्षणमंत्री ए के अँटनी यांच्या अ-कर्तृत्वाची भर पडल्याने हे सरकार धोरणलकवा असलेले आहे, अशी टीका सर्रास होऊ लागली होती.

वास्तविक, डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील काळात अनेक महत्वाच्या धोरणात्मक सुधारणा घडून आल्या. ‘मनरेगा’ म्हणून ओळखली जाणारी रोजगार हमी योजना असो की लहान शहरांमध्ये सुविधा देण्यासाठी कार्यरत झालेली जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय पुनर्निर्माण योजना – अनुदानांपासून दूर जाणाऱ्या आणि आर्थिक वाढीचा विचार करणाऱ्या अनेक योजनांची सुरुवातही या काळात झाली होती.

Maharashtra Deputy CM Ajit Pawar Dissolves NCP Beed Unit
राष्ट्रवादीची बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त; मंत्री धनंजय मुंडे यांना धक्का
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
anil Deshmukh Devendra fadnavis
‘गुड गव्हर्नन्स’ अहवालावरून माजी गृहमंत्र्यांकडून फडणवीस यांच्यावर टीका
Satej Patil On Municipal Elections 2025
Satej Patil : आगामी महापालिकेच्या निवडणुका काँग्रेस स्वतंत्र लढणार की आघाडीत? सतेज पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, “शक्य असेल तिथे…”
What Ajit Pawar Said?
Ajit Pawar : धनंजय मुंडे नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देणार का? विचारताच अजित पवारांचं उत्तर, “मी इतकं स्पष्ट सांगतो….”
sharad pawar slams amit shah news in marathi
देशाचे पहिले तडीपार गृहमंत्री! शरद पवारांचा अमित शहांवर प्रतिहल्ला
Hrishikesh Shelar
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’फेम अभिनेत्याने प्रियदर्शन जाधव, विशाखा सुभेदार यांच्याबरोबर काम करण्याचा सांगितला अनुभव, म्हणाला…
Solapur mayor Mahesh kothe death marathi news
Mahesh Kothe : कुंभमेळ्यात स्नान करताना सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचा हृदयविकाराने मृत्यू

लोकांची स्मरणशक्ती कमकुवत असते, याचा सर्वाधिक फटका त्या काळात सिंग यांना बसला. या एका वर्षात बहुसंख्य भारतीयांना, आर्थिक विकासाची समदृष्टी असलेल्या याच नेत्यामुळे २००८ चे जागतिक अर्थसंकट भारताच्या उंबरठ्याबाहेरच राहिले याचाही विसर पडला होता. डॉ. मनमोहन सिंग यांच्या कारकीर्दीतील सर्वात महत्त्वाचे काम म्हणून भारत- अमेरिका अणुऊर्जा कराराचा उल्लेख केला जातो. या कराराला संसदेची मान्यता मिळवण्यासाठी त्यांनी आपले पद पणाला लावले. अखेर या करारावर संसदेची मोहोर उमटली आणि भारतीय अणुसंशोधनाचा वनवास कायमचा संपुष्टात आला. राजकीय महत्त्वाकांक्षा न बाळगताही नेतृत्व दिसू शकते, देशाला दिशा देऊ शकते, याचा प्रत्यय त्या वेळी जसा आला, तसा त्याहीआधीच्या १९९१ ते १९९६ या काळात देशाचे अर्थमंत्री म्हणून, एकेकाळचे रिझर्व्ह बँक गव्हर्नर सिंग यांनी भारतीय अर्थव्यवस्थेची दिशा बदलली, तिला नव्या वाटेवर उभे केले आणि चालण्याची शक्तीही दिली. सोने गहाण ठेवण्याची नामुष्की आलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेने त्यांच्या अर्थमंत्रीपदाच्या काळात ७ टक्क्यांचा सकल राष्ट्रीय उत्पादन वाढदर प्रथमच (१९९४ मध्ये) पाहिला.

हेही वाचा >>> Dr. Manmohan Singh Death: मनमोहन सिंग म्हणाले होते, “…तो माझ्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा काळ”!

अनुदाने हवी, पण विकास अनुदान-आधारित असू नये, त्यासाठी रोजगारसंधीच हव्यात आणि त्या वाढवण्यासाठी उत्पादक उद्याोग हवे, हे सांगण्याची समज त्यांच्याकडे अर्थातच होती पण काही अनुदाने सुरू ठेवावी लागतील हे मान्य करण्याचा प्रांजळपणाही त्यांच्या ठायी होता.

उद्याोजकांच्या फिक्की किंवा असोचॅम यांसारख्या संस्थांच्या व्यासपीठांवर पंतप्रधान म्हणून त्यांनी केलेली भाषणे ही त्यांच्या अभ्यासू नेतृत्वाची साक्ष देणारी आहेत. अशा नेत्यावर राजकीय हेतूंनी शरसंधान होत असतानाच्या काळात त्यांचे माध्यम सल्लागार संजय बारू यांचे द ‘अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ या शीर्षकाचे पुस्तक आले आणि ते शीर्षकच सिंग यांना हिणवण्याचे साधन ठरले. पंतप्रधान पदासाठी स्वत:हून त्यांनी प्रयत्न केले नाहीत हे खरेच, पण एकदा हे पद मिळाल्यानंतर त्याकडे सेवेची संधी म्हणूनच पाहिले. त्या अर्थाने, इतका सच्छील आणि तरीही कृतनिश्चयी ‘‘ प्रधान सेवक’’ यापुढे होणे कठीणच !

अणुकरार: परराष्ट्र धोरण क्षेत्रातील मुकुटमणी

नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान म्हणून मनमोहन यांच्या नेतृत्वाखाली २००८ मध्ये अमेरिकेशी झालेला अत्यंत महत्त्वाचा नागरी अणुकरार हा परराष्ट्र धोरण क्षेत्रातील मुकुटमणी ठरला. या कराराने देशातील अणु कार्यक्रमाविषयी असलेली असहिष्णुताच संपुष्टात आली नाही तर त्यामुळे देशात अनुकूल असे भूराजकीय रचनाच अस्तित्वात आली.

अणुकरार संसदेत रणकंदन माजले. सरकारविरोधात अविश्वासाचा ठराव मांडण्यात आला. मनमोहन सिंग यांची पूर्ण कारकीर्द पणाला लागली होती. अशा प्रतिकूल परिस्थितीतही मनमोहन सिंग यांनी विरोधकांसमोर दृढनिश्चयी नेतृत्वाची झलक दाखवून अणुकरारावरील चर्चेची प्रक्रिया कायम ठेवली. त्यातूनच त्यांनी हा करार अस्तित्वात आणला. भविष्यातील अणुकराराचे महत्त्व त्यांनी देशाला पटवून दिले. त्यानंतर अमेरिकेशी भारताचे असलेले सर्व संबंध बदलले. त्यामुळे दोन्ही देशांमधील मुत्सद्देगिरीसह उच्च तंत्रज्ञान आणि संरक्षण क्षेत्रांतील विश्वास अधिक दृढ होत गेला. जुलै २००५ मध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांच्याशी बोलणी झाल्यानंतर दोन्ही देश नागरी अणुऊर्जेत सहकार्य करतील, असे जाहीर करण्यात आले. १९ जुलै २००५ रोजी भारत आणि अमेरिका यांच्यातील संयुक्त सभेत मनमोहन सिंग यांनी दोन्ही देशांत नागरी अणुकराराची का गरज आहे, याविषयी मत मांडले. त्यात त्यांनी अणुप्रसाराविरोधातील कराराशी भारत कसा कटिबद्ध याचे विवरण केले होते.

उदारीकरणाच्या धोरणाचे जनक

डॉ. मनमोहन सिंग यांना भारताच्या उदारीकरणाच्या धोरणाचे जनक मानले जाते. नव्वदीचे दशक उजाडत असताना परकीय गंगाजळीने तळ गाठला होता, चलनवाढ दुहेरी आकड्यांमध्ये होती, रिझर्व्ह बँकेला ४७ टन सोने जागतिक बँकांकडे गहाण ठेवावे लागले होते. देश आर्थिक संकटात सापडला असताना डॉ. मनमोहन सिंग यांनी तत्कालीन पंतप्रधान पी व्ही नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय अर्थमंत्री म्हणून काम केले. दोन्ही नेत्यांनी देशामध्ये आर्थिक सुधारणा घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. उदारीकरणाचा निर्णय घेताना रुपयाचे अवमूल्यन, आयातशुल्कात कपात, सरकारी मालकीच्या सार्वजनिक उद्याोगांचे खासगीकरण हे राजकीयदृष्ट्या कटू निर्णय घेतले.

वाणी मृदू, निर्णयात खंबीर

मितभाषी असलेले डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिमत्वात पदासाठीची महत्त्वाकांक्षा कधीच दिसली नाही उलट त्यांच्याकडे चालून आलेले केंद्रीय अर्थमंत्री पद आणि पंतप्रधान पद हे संधीपेक्षा आव्हानेच घेऊन आले. मितभाषी असलेल्या सिंग यांच्यासाठी राजकारणी म्हणून पूर्णवेळ वावरणे ही कसोटीच होती. ते त्यांना नीटसे जमले का, यावर वाद-प्रतिवाद असू शकतील. परंतु, त्यांच्या कार्यकाळात राबवलेल्या योजना आणि निर्णय त्यांच्यातील धोरणकर्त्याची साक्ष पटवणाऱ्या होत्या.

सोनिया गांधी यांनी पंतप्रधानपदास नकार दिल्याने २२ मे २००४ रोजी त्यांच्याकडे या पदाची धुरा आली. पुढे २००९ मध्ये पुन्हा त्यांच्याकडे पंतप्रधानपद आले. अमेरिकेबरोबरच्या अणूकरारासाठी त्यांनी घेतलेल्या ठाम भूमिकेने भारताला आण्विक क्षेत्रात बळकटी दिली. पहिल्या कार्यकाळात डाव्यांच्या पाठिंब्यावर चाललेल्या त्यांच्या सरकारला आर्थिक सुधारणांचे निर्णय घेताना अनेकदा राजकीय आव्हानांना तोंड द्यावे लागले. मात्र, डॉ. सिंग यांच्या विनयशील, प्रामाणिक स्वभावामुळे युपीएने तो कार्यकाळ पूर्णच केला नाही तर २००९मध्ये पुन्हा सत्ताही मिळवली. मनरेगा, माहितीचा अधिकार, शिक्षण हक्क कायदा, जवाहरलाल नेहरू नागरी पुनरूत्थान योजना, आधार या डॉ. सिंग यांच्या कार्यकाळातील लक्षवेधी निर्णय ठरले.

पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीच्या अखेरीस त्यांच्या सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. लोकपाल विधेयकासाठी झालेल्या अण्णा हजारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आंदोलनाने जनमानसात यूपीए-२ची प्रतिमा डागाळली. त्यावेळच्या राजकीय परिस्थितीत अपेक्षित कणखरपणा डॉ. सिंग दाखवू न शकल्याची बाब महत्त्वाची ठरली. दोषी राजकारण्यांना निवडणूक लढवण्यास अनुमती देण्यासाठी मंत्रिमंडळाच्या निर्णयाच्या अध्यादेशाच्या प्रती राहुल गांधी यांनी फाडल्यानंतर त्यांनी राजीनामा देण्याची तयारीही दर्शवली होती, असे सांगण्यात येते.

जीवनपट

●जन्म २६ सप्टेंबर १९३२ गह (पंजाब) सध्या हे गाव पाकिस्तानमधील पंजाबमध्ये आहे. फाळणीनंतर त्यांचे कुटुंब हल्दवनी येथे स्थायिक झाले.

●१९४८ मध्ये अमृतसर येथे वास्तव्यास, अमृतसर महाविद्यालयात शिक्षण. त्यानंतर पंजाबमधील होशियारपूरमध्ये अर्थशास्त्राचे अध्ययन.

●१९५२ मध्ये पदवी, तर १९५४ मध्ये द्विपदवीधर.

●१९५७ ते ६५ या काळात पंजाब विद्यापीठात अर्थशास्त्राचे अध्यापन.

●१९६६ ते ६९ संयुक्त राष्ट्रांच्या व्यापार आणि विकास कार्यक्रमात सहभाग. नंतर परराष्ट्र व्यापार मंत्रालयात सल्लागार म्हणून नियुक्त.

●१९६९ ते ७१ दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार या विषयाचे अध्यापन

●१९७२ अर्थमंत्रालयाचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्त

●१९७६ अर्थ मंत्रालयाचे सचिव

●१९८० ते ८२ नियोजन आयोगात नियुक्ती

●१९८२ रिझर्व बँकेचे गव्हर्नर

●१९८५ ते ८७ नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष

●१९८७-९० जिनिव्हात आर्थिक धोरणाशी संबंधित आयोगात सरचिटणीस

●१९९० देशात परतल्यावर चंद्रशेखर यांच्या कार्यकाळात पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार

●१९९१ मार्चमध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष

●१९९१ जूनमध्ये नरसिंह राव सरकारमध्ये अर्थमंत्री. याच वर्षी आसाममधून राज्यसभेवर निवड. पुढे १९९५, २००१, २००७ आणि २०१३ मध्ये राज्यसभेवर, तर १९९८ ते २००४ या काळात राज्यसभेचे विरोधी पक्षनेते

●१९९९ दक्षिण दिल्लीतून लोकसभा निवडणूक लढविली, मात्र यश मिळाले नाही

●२००४ ते २००९ : राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा पराभव करून काँग्रेस सत्तेत. २२ मे २००४ रोजी पंतप्रधान म्हणून शपथ

●२००९ ते २०१४ : काँग्रेस पुन्हा सत्तेत. २२ मे २००९ रोजी पंतप्रधानपदी फेरनिवड

शैक्षणिक आणि प्रशासकीय क्षेत्रांना तितक्याच सहजपणे हाताळण्याचे कसब असलेल्या मोजक्या राजकारण्यांपैकी डॉ. मनमोहन सिंग हे एक होते. सार्वजनिक क्षेत्रात अनेक जबाबदाऱ्या हाताळताना त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेत सुधारणांमध्ये मोलाचे योगदान दिले. त्यांची देशसेवा, राजकीय कारकीर्द आणि पराकोटीची नम्रता यासाठी ते कायम स्मरणात राहतील. भारताच्या या महान सुपुत्राला मी श्रद्धांजली वाहते आणि त्यांचे आप्तस्वकीय आणि पाठिराख्यांचे मनापासून सांत्वन करते. – द्रौपदी मुर्मू, राष्ट्रपती

● देशाच्या अर्थकारणाचा चेहरामोहरा बदलणारे माजी पंतप्रधान व ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतीव दु:ख झाले. पद्माविभूषण डॉ. सिंग हे १९९१मधील खुल्या अर्थव्यवस्थेचे शिल्पकार होते. अत्यंत महत्त्वाच्या स्थित्यंतरांमधून जाताना त्यांनी निडरपणे देशाला पुढे नेले आणि विकास व समृद्धीचे मार्ग खुले करून दिले. अर्थव्यवस्थेतील त्यांची जाण, साधे वागणे आणि देशाच्या प्रगतीसाठी अतूट कटिबद्धता यामुळे ते कायमच स्मरणात राहतील. – जगदीप धनखड, उपराष्ट्रपती

● भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ते देशाचे अर्थमंत्री आणि पंतप्रधान राहिलेल्या डॉ. मनमोहन सिंग यांनी देशाच्या शासन व्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या दु:खाच्या प्रसंगी त्यांचे आप्तस्वकीय आणि समर्थकांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. वाहेगुरू त्यांच्या आत्म्याला सद्गती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो, अशी प्रार्थना करतो. – अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री

● डॉ. मनमोहन सिंग यांना इतिहास नि:संशयपणे न्याय देईल. त्यांच्या निधनामुळे एक दूरदर्शी राजकारणी, सचोटीचा नेता आणि अतुलनीय उंची असलेला अर्थतज्ज्ञ देशाने गमावला आहे. त्यांच्या आर्थिक उदारीकरणाच्या धोरणाने कोट्यवधी भारतीयांच्या जीवनात बदल घडवून आणला आणि करोडो लोकांना गरिबीतून बाहेर काढले. विचारवंत आणि भारताच्या आकांक्षांना मूर्त रूप देणारे माझे ज्येष्ठ सहकारी मी गमावले आहेत. कामगारमंत्री, रेल्वेमंत्री आणि समाजकल्याण मंत्री म्हणून त्यांच्या मंत्रिमंडळाचा सदस्य असल्याचा मला अभिमान आहे. – मल्लिकार्जून खरगे, अध्यक्ष, काँग्रेस

● माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ज्ञ मनमोहन सिंग यांचे निधन म्हणजे देशाचे मोठे नुकसान आहे. भारतीय राजकारणातील दिग्गज असलेल्या या द्रष्टा नेत्याने नेहमीच गरीबांच्या उत्थानासाठी काम केले. – जगत प्रकाश नड्डा, अध्यक्ष, भाजप

● अर्थमंत्री या नात्याने भारतीय अत्यंत कठीण काळात त्यांनी देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढले आणि जागतिकीकरण व उदारीकरणाच्या मार्गावर नेले. डॉ. सिंग विनम्रता, सौजन्य आणि विद्वत्तेसाठी ओळखले जात. आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांमधून त्यांनी संसदेतील चर्चांचा स्तर उंचावला. सी पी राधाकृष्णन, राज्यपाल

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने आपण एक चतुर अर्थतज्ज्ञ आणि राजकारणी गमावला आहे. अर्थव्यवस्थेतील सुधारणांमधील त्यांचे योगदान आणि १० वर्षे पंतप्रधान म्हणून त्यांनी केलेल्या कामाने ते कायम स्मरणात राहतील. मी त्यांनी मन:पूर्वक श्रद्धांजली वाहतो. त्यांचे कुटुंब, मित्रपरिवार आणि पाठिराख्यांविषयी सहवेदना आहेत. ॐ शांति ! देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

●आपल्या देशाने एक महान अर्थतज्ज्ञ, द्रष्टा सुधारणावादी आणि जागतिक धुरंधर नेता गमावला आहे. त्यांच्या रूपाने एक ईश्वरीय आत्मा स्वर्गाच्या प्रवासाला निघून गेला ही अतिशय वेदनादायक बातमी आहे. डॉ. सिंग विनयशीलता, सहनशीलता, सहिष्णुता आणि करुणेचे प्रतीक होते. भारताची आर्थिक सुधारणा घडवून आणणारे हे महान व्यक्तिमत्त्व येणाऱ्या पिढ्यांसाठी अक्षय्य प्रेरणास्राोत राहिल. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो !

शरद पवारअध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (शप)

● देशाला आर्थिक महासत्ता बनवण्याच्या कार्याचा पाया त्यांनी रचला. गेल्या अनेक दशकात आलेल्या प्रत्येक जागतिक मंदीसमोर भारताची अर्थव्यवस्था पाय घट्ट रोवून भक्कमपणे उभी राहिली, याचे श्रेय सिंग यांना जाते. त्यांच्या निधनाने देशाचे सभ्य, सुसंस्कृत, विश्वासार्ह नेतृत्व हरपले आहे. देश आपल्या सुपुत्राला मुकला आहे.

अजित पवारउपमुख्यमंत्री

● अर्थमंत्री आणि नंतर पंतप्रधान असताना देशाच्या आर्थिक विकासाला वेग देणारी दमदार पाऊले उचलून देशाच्या अर्थव्यवस्थेचे नवे दालन खुले करणारा क्रांतिकारक निर्णय घेणारा द्रष्टा नेता अशी त्यांची ओळख इतिहासात कायम राहील. साध्या, सरळ आणि शांत स्वभावाचे डॉ. सिंग नामवंत अर्थतज्ज्ञ म्हणून जागतिक स्तरावर ओळखले जात होते. एक धोरणी आणि हुशार अर्थतज्ज्ञ, राजकीय नेतृत्व हरपले आहे.

एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री

● चातुर्य आणि प्रामाणिकपणाने मनमोहन सिंगजी यांनी देशाचे नेतृत्व केले. त्यांची विनयशीलता आणि अर्थकारणाची जाण याने देशाला कायमच प्रेरणा दिली. सौ. कौर आणि कुटुंबीयांप्रती माझ्या सहवेदना. मी माझा मार्गदर्शक गमावला आहे. माझ्यासारखे त्यांचे कोट्यवधी प्रशंसक त्यांना कायम अभिमानाने स्मरणात ठेवतील.

राहुल गांधीविरोधी पक्षनेते, लोकसभा

● डॉ. मनमोहन सिंग यांच्याबाबत बोलणे हा माझ्यासाठी अत्यंत भावूक क्षण आहे. १९९१ ते २०१४ या काळातील डॉ. सिंग यांचे आयुष्य आणि त्यांनी केलेले काम भारताच्या इतिहासातील एक सोनेरी पान आहे. मी अनेक वर्ष त्यांच्याबरोबर अत्यंत जवळून काम केले. डॉ. सिंग यांच्याइतकी प्रभावशाली तरीही विनम्र व्यक्ती मी बघितलेली नाही. आपल्या ऐतिहासिक कामगिरीचे श्रेय घेण्याचा त्यांनी कधीही प्रयत्न केला नाही. डॉ. सिंग यांचे अर्थमंत्री होणे म्हणजे देशासाठी इतिहासाला कलाटणी होती.

पी. चिदंबरममाजी केंद्रीय अर्थमंत्री

Story img Loader