पंडित गजाननबुवा जोशी यांच्या अध्यक्षतेखाली स्वामी शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठान ही संस्था सुरू करण्यात आली. औंध संगीत महोत्सवाव्यतिरिक्त ही संस्था गेली ३४ वर्षे संगीत क्षेत्रात अनेक उपक्रम राबवत आहे. यात संगीताचा प्रचार व प्रसार करणारी संगीत शिक्षण शिबिरे, परिसंवाद, चर्चासत्रे, कार्यशाळा आदी उपक्रमांचा समावेश आहे. यात बंदिश, अनवट राग या विषयांवरील कार्यशाळांची उदाहरणे देता येतील.
सातारा जिल्ह्य़ातील औंध संस्थान. या संस्थानातील राजगायक पंडित अनंत मनोहर जोशी यांचे आध्यात्मिक गुरू म्हणजेच शिवानंद स्वामी. १९३९ मध्ये अश्विन वद्य पंचमीस स्वामी शिवानंद यांनी समाधी घेतली. त्यांच्या पहिल्या पुण्यतिथीस पंडित अनंत जोशी यांनी स्वामींच्या समाधीस्थानी दत्त मंदिराची प्रतिष्ठापना करून औंध संगीत महोत्सवाची सुरुवात केली.
प्रारंभी काही वर्षे हा महोत्सव दत्त मंदिरातच आयोजित केला जात असे. या महोत्सवाच्या आयोजनाची सर्व जबाबदारी पंडित अनंत जोशी आणि त्यानंतर त्यांचे पुत्र पंडित गजाननबुवा जोशी यांनी पार पाडली. शास्त्रीय गायन आणि त्या वेळचे ज्येष्ठ-श्रेष्ठ कलावंतांना ऐकणं ग्रामीण भागातील सामान्य आणि शेतकऱ्यांना त्या वेळी आणि आताही तसं दुरापास्तच. त्यामुळे साताऱ्यासह कोल्हापूर, सांगली आणि सीमा भागातील रसिकांसाठी हा महोत्सव. केवळ पैसे नसल्याने दर्जेदार संगीत ऐकण्याची संधीच मिळू नये असे होता कामा नये या विचारांतूनच हा महोत्सव प्रथमपासूनच विनामूल्य ठेवण्यात आला. ती प्रथा आजतागायत सुरू आहे. दरम्यानच्या काळात स्थानिक आमदार केशवराव पाटील यांनी महोत्सवासाठी दत्त मंदिरासमोर एक हॉल बांधून दिला.
१९८० पर्यंत ‘औंध संगीत महोत्सव’ हा केवळ जोशी कुटुंबीयांनीच चालवला. मात्र दिवसेंदिवस त्याची व्याप्ती आणि प्रसिद्धी आणि गर्दी लक्षात घेता महोत्सवाचा आर्थिक भार उचलणं जोशी कुटुंबीयांना अवघड जाऊ लागलं. त्यामुळे पंडित गजाननबुवा जोशी यांचे पुत्र मनोहर जोशी यांनी त्यांना एक विश्वस्त संस्था स्थापन करून तिच्याद्वारे हा उपक्रम सुरू ठेवण्याचा सल्ला दिला. त्यानुसार ४ जानेवारी १९८१ साली पंडित गजाननबुवा जोशी यांच्या अध्यक्षतेखाली स्वामी शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठान ही संस्था सुरू करण्यात आली. औंध संगीत महोत्सवाव्यतिरिक्त ही संस्था गेली ३४ वर्षे संगीत क्षेत्रात अनेक उपक्रम राबवत आहे. यात संगीताचा प्रचार व प्रसार करणारी संगीत शिक्षण शिबिरे, परिसंवाद, चर्चासत्रे, कार्यशाळा आदी उपक्रमांचा समावेश आहे. यात बंदिश, अनवट राग या विषयांवरील कार्यशाळांची उदाहरणे देता येतील.
आतापर्यंत या महोत्सवात पंडित गजाननबुवा जोशी, पंडित निवृत्तीबुबा सरनाईक, पंडित वसंतराव देशपांडे, स्वरभास्कर भीमसेन जोशी यांच्यासारख्या ज्येष्ठ-श्रेष्ठ कलाकारांनी संगीतसेवा केली आहे. सध्या या महोत्सवास ग्रामीण भागांतून साधारणत: हजार रसिक हजेरी लावतात. तसेच विविध संगीत महाविद्यालयांतील विद्यार्थी, चित्रकला महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचीही आवर्जून उपस्थिती असते. सकाळपासून चार सत्रांत हा महोत्सव सुरू असतो.
सध्याच्या औंध संस्थानच्या राणी गायत्रीदेवी यांनी महोत्सवास होणारी गर्दी आणि अपुरा पडणारा हॉल ही अडचण लक्षात घेऊन औंध कला मंदिर नावाचा हॉल बांधून दिला आहे. तेथेच सध्या हा महोत्सव होत असून महोत्सवाच्या वेळी येणाऱ्या श्रोत्यांची राहण्याची व्यवस्थाही या हॉलमध्येच केली जाते.
आव्हाने, अडचणी
संस्थेतर्फे सुरू असलेला औंध महोत्सव हा पूर्णत: नि:शुल्क आहे. मात्र महोत्सवाचे आयोजन, तेथील व्यवस्था, महोत्सवास येणाऱ्या कलाकारांचे मानधन, त्यांची जाण्या-येण्याची, त्याचप्रमाणे राहण्याची व्यवस्था कलाकारांप्रमाणेच रसिकश्रोते यांची व्यवस्था, पिण्याच्या पाण्यापासून ते जेवणापर्यंत आणि महोत्सवासाठीची साऊंड अॅण्ड रेकॉर्डिग सिस्टीम यासाठीचा निधी ही संस्थेसमोरील मोठी समस्या आहे. वाढत्या महागाईमुळे निधीची चणचण मोठय़ा प्रमाणात भासते. संस्थेने २००१ मध्ये पंडित गजाननबुवा जोशी (www.gajananbuwajoshi.com)
) हे संकेतस्थळ सुरू केले. या संकेतस्थळावर रसिकांना पंडित गजाननबुवांच्या गायनाचे आणि व्हायोलिन वादनाच्या कार्यक्रमांचे ध्वनिमुद्रण उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच शिष्यांना शिकवतानाचे रेकॉर्डिगही येथे उपलब्ध करून देण्यात आले आहे. अर्थात तेही नि:शुल्क आहे. या वेबसाइटच्या मेंटेनन्सवरही मोठय़ा प्रमाणात खर्च होतो. संस्थेकडे अनेक वाद्ये आहेत. त्या वाद्यांच्या देखभालीसाठीही संस्थेकडील निधी खर्च होतो. या व्यतिरिक्त कार्यालय व्यवस्था, सदस्यांशी पत्रव्यवहार, संपर्क, कार्यक्रमांची जाहिरात यांचा खर्च वेगळाच (सध्याचे कार्यालय हे जोशी कुटुंबीयांचे राहते घर त्यांनी दीर्घ मुदत कराराने केवळ एक रुपये भाडय़ाने दिले आहे.). संस्था कल्याण-डोंबिवली परिसरात संगीतविषयक तीन ते चार कार्यक्रम आयोजित करते. त्या कार्यक्रमांसाठी जागा पाहण्यापासून ते नियोजनापर्यंतचा खर्च संस्थेतर्फे केला जातो. अर्थात हे सर्व कार्यक्रमही विनामूल्य असतात.
आतापर्यंत निधीची जुळवाजुळव
आतापर्यंत मिळालेल्या देणग्या या मुदत ठेव या योजनेत ठेवून त्यावर मिळणाऱ्या व्याजातून निधी उभारला जातो. तसेच संस्थेचे सदस्य नोंदणी वर्गणीतून मिळणाऱ्या निधीतून महोत्सवाचा खर्च केला जातो. तसेच सावित्रीबाई फुले विद्यापीठातील ललित कला केंद्राने सातत्याने पाठिंबा दिला आहे. संस्थेतर्फे दरवर्षी उत्सवात प्रकाशित केल्या जाणाऱ्या ‘रियाज’ या स्मरणिकेच्या जाहिरातींच्या माध्यमातूनही निधीची उभारणी होते.
संस्थेच्या भविष्यातील योजना
अतिशय जुना असलेला आणि ग्रामीण भागांत तेथील रसिक श्रोत्यांसाठी चालवला जाणारा औंध महोत्सव संस्थेला अखंडित सुरू ठेवायचा आहे. पंडित अनंत मनोहर जोशी हे ग्वाल्हेर घराण्याचे बुजुर्ग गायक पंडित बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांच्या प्रमुख शिष्यांपैकी एक होत. हिंदूस्तानी शास्त्रीय संगीतातील त्यांच्या बहुमोल कामगिरीचा गौरव सरकारने १९५५ साली त्यांना ‘संगीत नाटक अकादमी पुरस्कार’ देऊन केला.
महाराष्ट्रात व्हायोलिनला स्वतंत्र स्थान मिळवून देण्याचे सर्व श्रेय पंडित गजाननबुवा जोशी यांना जाते. तसेच ग्वाल्हेर, आग्रा आणि जयपूर या तिन्ही घराण्यांची तालीम लाभलेले एक थोर गायक होते.
एका घराण्याची गायकी आत्मसात केल्यानंतर ते दुसऱ्या घराण्याकडे वळले. त्यामुळे ते विभिन्न गायकी व त्यातील चलने हुकमीपणे वेगळी दाखवू शकत. संस्थेकडे पंडित गजाननबुवा जोशी यांच्या व्हायोलिन वादनाच्या आणि गायनाच्या अनेक रेकॉर्डिग्ज उपलब्ध आहेत. तसेच पंडित अनंत जोशी आणि पंडित गजाननबुवा जोशी यांच्या रचनाही संस्थेकडे आहेत. संस्थेला ते सर्व सी.डी., पुस्तक, संकेतस्थळामार्फत उपलब्ध करून द्यायचे आहे. सध्याचे संकेतस्थळ अधिक प्रगत करायचे आहे. तसेच संस्थेकडील रेकॉर्डिग्ज वेगवेगळ्या ठिकाणच्या रसिक श्रोत्यांना त्यांच्या वेळेनुसार ऐकायला मिळाव्यात यासाठी त्याची लायब्ररी तयार करून ती ऐकण्यासाठी खास ‘साऊंड प्रूफ’ खोली अथवा स्टुडिओ तयार करण्याची योजना आहे. सध्या संस्था कल्याण-डोंबिवली परिसरात वर्षांतून केवळ तीन ते चार संगीतविषयक कार्यक्रम आयोजित करते. त्या कार्यक्रमाची व्याप्तीही वाढवायची आहे. पंडित गजाननबुवा यांचे वास्तव्य जेथे होते त्या कल्याण-डोंबिवली परिसरात पंडित गजाननबुवा जोशी संगीत महोत्सव सुरू करण्याचा संस्थेचा मानस आहे.
हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत जतन करणे आणि अभिजात संगीताचा प्रसार करणे हाच संस्थेचा मुख्य हेतू आहे. पंडित गजाननबुवा जोशी यांच्या रेकॉर्डिगच्या माध्यमातून संस्थेला संगीताचा वारसा जतन करण्याची संधी मिळाली आहे. जी त्यांनी आतापर्यंत जपली आहे. अनेक घराण्यांची गायकी केवळ कित्येक श्रीमंतांच्या घरातील शोकेसची ठेव झाली असताना संस्थेकडील ठेवा संस्थेला संगीत शिकणाऱ्या विद्याथ्र्र्याप्रमाणेच अधिकाधिक सामान्य रसिकांना उपलब्ध करून जतन करायचा आहे. मात्र त्यासाठी हवी आहे दानशूर मोठय़ा मनाच्या व्यक्तींची मदत..
महापालिकेचे साहाय्य गरजेचे
शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठान कल्याण-डोंबिवली परिसरात आयोजित करत असलेल्या विनामूल्य कार्यक्रमासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेने मदत केल्यास नक्कीच कार्यक्रमांची व्याप्ती वाढवता येईल. तसेच संस्थेकडे असणारा रेकॉर्डिगचा ठेवा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवता येईल, ्असे संस्थेचे खजिनदार सुरेश मातोंडकर म्हणाले.
संस्थेपर्यंत कसे जाल?
डोंबिवली पूर्वेकडे उतरल्यावर टिळक चौकातून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याच्या उजव्या हातास नादब्रह्म इमारतीत संस्थेचे कार्यालय आहे.
शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठान, डोंबिवली
औंध संगीत महोत्सवाचे हे ७५ वे वर्ष आहे. दोन अथवा तीन दिवस चालणारा हा महोत्सव गेली काही वर्षे निधीच्या कमतरतेमुळे केवळ एकच दिवस होतो. मात्र अमृत महोत्सवी वर्षांनिमित्त ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबर असे दोन दिवस रसिक श्रोत्यांना शास्त्रीय संगीत ऐकण्याची पर्वणी लाभणार आहे. महोत्सव दिमाखदार आणि दर्जेदार होण्यासाठी सर्व कार्यकर्ते अहोरात्र परिश्रम घेत आहेत.
प्रसिद्ध आणि ज्येष्ठ कलावंतांना ग्रामीण भागांत आमंत्रित करून रसिक श्रोत्यांना त्यांना ऐकण्याची विनामूल्य संधी देणे तसे अवघड आहे. शहरी भागांत सहज प्रायोजक मिळतात मात्र ग्रामीण भागांतील या महोत्सवास प्रायोजक मिळणे अवघड जाते. त्यामुळे तुटपुंज्या निधीतून दर्जेदार सोहळा करणे अवघड होत आहे. – अपूर्वा गोखले (सहसचिव)
धनादेश या नावाने काढावेत
शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठान
(Shivanand Swami Sangeet Pratishthan)
(कलम ८०जी नुसार देणग्या
करसवलतीस पात्र आहेत) संस्थांकडे धनादेश नोव्हेंबर महिन्यात सुपूर्द केले जातील.
धनादेश येथे पाठवा..एक हजार किंवा त्याहून अधिक रुपयांची देणगी देणाऱ्यांची नावे ‘लोकसत्ता’त प्रसिद्ध केली जातील.
मुंबई कार्यालय
लोकसत्ता, संपादकीय विभाग, एक्स्प्रेस टॉवर्स, पहिला मजला, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०००२१, (०२२-६७४४०५३६)
महापे कार्यालय
संपादकीय विभाग, प्लॉट
नं. ईएल १३८, टीटीसी इंड. एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई – ४००७१० (०२२-२७६३९९००)
ठाणे कार्यालय
संपादकीय विभाग, कुसुमांजली बिल्डिंग, दुसरा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे. (०२२-२५३९९६०७)
पुणे कार्यालय
संपादकीय विभाग,
एक्स्प्रेस हाऊस, प्लॉट
नं. १२०५/२/६, शिरोळे
रस्ता, पुणे – ४११००४. ०२०-६७२४१०००
नाशिक कार्यालय
संपादकीय विभाग, स्टेडियम कॉम्प्लेक्स नं. ६, पहिला मजला, महात्मा गांधी मार्ग, नाशिक – ४२२००१. (०२५३-२३१०४४४)
नागपूर कार्यालय
संपादकीय विभाग,
प्लॉट नं. १९, ग्रेट नागरोड, उंटखाना, नागपूर – ४४०००९, (०७१२ – २७०६९२३)
औरंगाबाद कार्यालय
संपादकीय विभाग,
१०३, गोमटेश मार्केट, औषधी भवनजवळ, नवा गुलमंडी रस्ता, औरंगाबाद. (०२४०-२३४८३०३)
नगर कार्यालय
संपादकीय विभाग,
१६६, अंबर प्लाझा, पहिला मजला, स्टेशन रोड, अहमदनगर. (०२४१-२४५१५४४/२४५१९०७)
दिल्ली कार्यालय
संपादकीय विभाग, एक्स्प्रेस बिल्डिंग, बी१ / बी,
सेक्टर- १० नोएडा (गौतम बुद्ध नगर, उत्तर प्रदेश) – २०१३०१
(०१२०- ६६५१५००)