रवींद्र माधव साठे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दिल्लीतील निजामुद्दीनमधील तबलीगी जमात मरकजच्या निमित्ताने अनेक उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या. त्यात ‘तबलीगी जमातचा कट’ हा प्रचार बहुसंख्यांकडून केला गेला. मात्र सामान्य भारतीय  मुस्लीम या साऱ्याकडे कसे पाहतात, याची चर्चा बाजूला पडली. या दोन्ही बाजू मांडणारे लेख..

राजधानी दिल्लीत निजामुद्दीन येथे अलीकडेच तबलीघी जमातने मरकजचे आयोजन केले होते. यांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरून सुमारे ३,४०० प्रतिनिधी सहभागी झाले होते. या सहभागींपैकी १७ राज्यांतील १,४४५ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अधिकृतपणे घोषित केले आहे. तसेच रुग्णांच्या संपर्कात आलेल्या देशभरातील २५,००० नागरिकांवर शासन विशेष लक्ष देणार आहे. दिल्ली राज्य सरकारने १२ मार्चला लावलेले १४४ कलम, १६ मार्च रोजी मुख्यमंत्री केजरीवाल यांनी कोणत्याही धार्मिक संमेलनास ५० पेक्षा जास्त प्रतिनिधी एकत्रित होण्यास केलेला मनाईहुकूम, २२ मार्चचा जनता कर्फ्यू व त्यानंतर २४ मार्चच्या मध्यरात्रीपासूनची पूर्ण संचारबंदी, या पार्श्वभूमीवर दिल्लीत झालेले मरकज हे वादग्रस्त ठरले आहे. सध्या मीडियामधून  तबलीघी जमात व मरकज  हे शब्द वारंवार कानावर पडत आहेत. त्यामुळे मुळात या चळवळीची प्रथम माहिती करून घेणे हे सयुक्तिक ठरेल.

आर्य समाजाला प्रतिबंध..

डॉ. श्रीरंग गोडबोले हे ‘राष्ट्रवाद आणि इस्लाम’ या विषयाचे एक गाढे अभ्यासक. त्यांनी ‘इस्लामचे अंतरंग’ या विषयावर एक पुस्तक लिहिले आहे. त्यात तबलीघी जमातचे शास्त्रशुद्ध विवेचन आहे. इस्लाममध्ये देवबंध विचारसरणी आहे. तबलीघी जमात हे त्याचेच एक अपत्य. मौलाना मुहम्मद इलियास हा त्यांचा संस्थापक. या चळवळीचा उगम झाला तो भारतात १९२६ मध्ये. इलियास हा मूळचा सहारणपूर येथे मदरशात शिक्षक होता. मदरशात दिल्या जाणाऱ्या शिक्षणाबद्दल तो समाधानी नव्हता. त्याने शिक्षकी पेशाचा राजीनामा दिला. १९२५ मध्ये हज यात्रा करून तो इस्लामच्या प्रसारार्थ दिल्लीत बस्ती निजामुद्दीन येथे स्थायिक झाला.

निजामुद्दीन अवलिया या सूफी संताची कबर असलेले बस्ती निजामुद्दीन हे सुलतान बल्बन (१२६६-१२८६) च्या काळापासून जिहाद संघटित करण्याचे एक केंद्र.  याच भागात इलियासने तबलीघी जमात ही चळवळ सुरू केली. इलियासचा संबंध मेवातींशी आला. मेवात हे स्थान आता हरियाणात आहे. मेवातींमधील धार्मिक व आध्यात्मिक दारिद्रय़ाने दु:खी होऊन त्यांनी त्यांच्यात धार्मिक सुधारणा घडवून आणण्यास सुरुवात केली. मेवाती हे अडाणी आणि निरक्षर होते. या मेवातींनी बहुसंख्येने इस्लामची दीक्षा घेतली. इस्लामची दीक्षा घेतली तरी त्यांनी मूळचे हिंदू संस्कार सोडले नव्हते. त्याच सुमारास आर्य समाजाच्या शुद्धी चळवळीने जोर धरला होता. त्यामुळे संघर्षांची पहिली ठिणगी पडली. आर्य प्रसारकांच्या कारवायांना प्रतिबंध घालण्यासाठी कुराणाच्या शिक्षणाव्यतिरिक्त इस्लामचे प्राथमिक धार्मिक शिक्षण देणारे अनेक मदरसे इलियासने सुरू केले. धार्मिक कार्यात गुंतवून ठेवल्याचा परिणाम असा झाला की, धर्मातरित होऊनही हिंदू संस्कार न सोडलेल्या मेवातींनी आपल्या दाढय़ा वाढविल्या. इस्लामपूर्व प्रथा त्यांनी झटकून दिल्या. हिंदू पद्धतीच्या परिवेशाविषयी घृणा उत्पन्न करण्यात आली. अल्लाचा संदेश पोहोचविण्याची प्रेरणा व शरियतचे वर्चस्व प्रस्थापित झाले. प्रत्येक वस्तीत मशीद व मदरशांचे जाळे पसरले गेले. हैदराबादच्या निजामने आणि देशातील इतर काही नवाबांनी इलियासच्या या प्रयत्नांना आर्थिक रसद पुरवली. इतिहासात तसे उल्लेख आहेत. १९४१ मध्ये बस्ती निजामुद्दीनमध्ये तबलीघी जमातीची पहिली परिषद (मरकज) भरवली गेली. त्यास २५,००० लोक उपस्थित होते.

अमेरिकेतील एक अधिकृत अहवाल

इलियासचा १९४४ मध्ये मृत्यू झाला. त्यानंतर जमातचे नेतृत्व मुहम्मद युसूफकडे आले. युसूफने देशात व परदेशात तबलीघी जमातच्या प्रचार व प्रसारासाठी प्रवास केला. त्याचाच परिणाम असा की, आज ही चळवळ १८० देशांमध्ये पोचली आहे आणि सुमारे १५० दक्षलक्षांहून अधिक त्याचे अनुयायी आहेत. भारत, पाकिस्तान व बांगलादेशात वार्षिक मरकज भरवले जातात. विसाव्या शतकातील तबलीघी जमात ही इस्लाममधील मोठी प्रभावी धार्मिक चळवळ झाली आहे. ही चळवळ राजकारण व न्यायतत्त्वशास्त्राशी संबंधित नसून धर्मपरिवर्तन करण्यासाठी हिंसा त्याज्य मानते, असा दावा या चळवळीशी संबंधित मंडळी नेहमी करताना दिसतात. परंतु प्रत्यक्षात चित्र काहीसे वेगळेच आहे, कारण ही चळवळ विविध देशांतून इस्लाममधील बंडखोर व उग्रवादी मानसिकतेस खतपाणी घालत असल्याचे पुढील काही उदाहरणांवरून स्पष्ट होईल. ‘अमेरिकन विदेशनीती सल्लागार मंडळा’च्या ‘तबलीघवरील अधिकृत अहवाला’प्रमाणे आज जगभरात जे जिहादी गट कार्यरत आहेत त्यांना तबलीघी जमातचा छुपा पाठिंबा आहे.

मार्क गॅबेरिऊ हा तबलीघवरील एक  फ्रेंच अभ्यासक आहे. तबलीघीच्या तत्त्वज्ञानात सर्व जगावर विजय मिळविण्याच्या पूर्वनियोजित रणनीतीचा समावेश आहे. आज फ्रान्समध्ये इस्लामी दहशतवादी संघटनांचे ८० टक्के प्रतिनिधी हे तबलीघी जमातशी संबंधित आहेत, हे त्याने पुराव्यानिशी सिद्ध केले आहे.

श्रद्धानंद हत्या ते नियोजित बॉम्बहल्ला

२००१ मध्ये अमेरिकेने अफगाणिस्तानात तोरा-बोरा येथे केलेल्या बॉम्बहल्ल्यात मारला गेलेला हर्वे लुईझे, २००५ मध्ये पॅरिसमध्ये अमेरिकन वकिलातीवरील बॉम्बहल्ल्याच्या फसलेल्या प्रयत्नामागच्या सूत्रधार जॅमेल बेघल, २००८ मध्ये स्पेनमधील मीडिया वृत्ताप्रमाणे बार्सलिोना येथे नियोजित बॉम्बहल्ल्यात पकडले गेलेले १४ लोक या सर्वाचे तबलीघी जमातशी उघड संबंध होते. पोर्टलँड सेव्हन २००७ तसेच लंडनमधील दहशतवादी बॉम्बहल्ले, त्याच वर्षी झालेला ग्लास्गो आंतरराष्ट्रीय विमानतळावरील दहशतवादी हल्ला याही तबलीघीच्या कारवायांशी जोडलेल्या अन्य काही बोलक्या घटना होत. मरकजच्या भारतातील प्रारंभीच्या काळात शुद्धी चळवळीचे प्रणेते स्वामी श्रद्धानंद यांची हत्या करणारा अब्दुल रशीद हा तबलीघी होता हे नमूद करावेसे वाटते.

वरील पृष्ठभूमीवर निजामुद्दीन येथे झालेल्या मरकजचे आयोजन व त्यातून निर्माण झालेल्या प्रश्नांकडे गांभीर्याने बघितले गेले पाहिजे. मुळात जमावबंदीचा आदेश असताना व सरकारने सोशल डिस्टन्सिंगचे आवाहन केले असताना आयोजकांनी हे संमेलन योजलेच कसे?

पर्यटक व्हिसावर धार्मिक कार्यक्रम?

स्थानिक पोलीस अधीक्षकाने आयोजकांच्या प्रमुख मंडळींना बोलावून जागा त्वरित मोकळी करण्याची समज दिली होती, परंतु तीही धुडकावून लावण्यात आली. या मरकजमध्ये १०० पेक्षा अधिक विदेशी नागरिक सहभागी झाले होते. त्यांच्याकडे पर्यटक व्हिसा होता. मग प्रश्न हा आहे की धार्मिक कार्यक्रमात ते सहभागी कसे काय झाले आणि प्रकरण एवढय़ावरच थांबले नाही तर मरकजमध्ये त्यांनी धार्मिक प्रवचने दिल्याचेही अधिकृत वृत्त आहे.

विदेशातून आलेल्यांना स्वयं विलगीकरण करण्यासही सांगण्यात आले होते. तसे न होणे, हे तर व्हिसाबद्दलच्या नियमांचे सरळ-सरळ उल्लंघनच होय. १५ देशांतून हे विदेशी नागरिक आले होते. आता या नागरिकांनी त्यांच्या देशात कायदा मोडण्याचे साहस केले असते का?

‘कागज नही दिखायेंगे’..

मरकजचा गट कायद्याला धाब्यावर बसवून कार्यक्रमाचे आयोजन करण्यास कसा धजावू शकतो आणि आश्चर्याची गोष्ट अशी की येता-जाता मोदी शासनावर सदा आसूड ओढणारे सेक्युलॅरिझमचे खासे पुरस्कत्रे गप्प कसे? कारण मरकजचे आयोजन हे ‘कागज नही दिखायेंगे’ या मनोवृत्तीचे एक प्रतिबिंब आहे.

मरकजमध्ये सामील झालेली मंडळी निश्चितच निरक्षर नाहीत. नागरिक म्हणून स्वयंशासन पाळण्याची त्यांचीही जबाबदारी होतीच.

मौलवी साद: भाषणाचा तपशील

मरकजचा प्रमुख मौलवी साद याने सहभागी प्रतिनिधींसमोर याच काळात एक भाषण दिले. त्यात तो म्हणतो, ‘‘आज सरकार आपल्या एकत्र येण्याला विरोध करत आहे, परंतु अल्लाचा संदेश सर्वश्रेष्ठ असून, जर तुम्हाला मशिदीत मृत्यू आला तर पवित्र ठरेल.’’ साद याने दिलेले भाषण मौलाना महम्मद युसूफने ३० मार्च १९६६ रोजी रावळिपडी येथे झालेल्या भाषणाशी मिळतेजुळते आहे. ‘इस्लामी बंधुभाव’ यावर तो म्हणतो, ‘‘उम्मा स्थापना करण्यासाठी प्रेषित आणि त्याच्या सोबत्यांनी खूप कष्ट घेतले. माझे राष्ट्र, माझा प्रदेश, माझे लोक हे शब्द दुहीला जन्म देतात. कोणत्याही गोष्टीपेक्षा अल्लाहला ही गोष्ट अमान्य आहे. कोणतीही किंमत देऊन आपण एकत्र राहणे गरजेचे आहे. इतर गट किंवा राष्ट्रावर इस्लामच्या उम्माचे वर्चस्व असले पाहिजे.’’ देशाच्या कायद्यापेक्षा व घटनेपेक्षा धर्म व अल्लाचा संदेश मोठा असे मरकजच्या आयोजनाने दाखवून दिले आहे.

म्होरक्याच बेपत्ता

मरकजमध्ये सहभागी झालेले प्रतिनिधी भारतातील १७ राज्यांत गेले आणि सरकारी आकडेवारीप्रमाणे गेल्या आठवडय़ात मरकजमुळे कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली. अनेक राज्यांमध्ये मरकजमध्ये सहभागी झालेल्या प्रतिनिधींचा शोध घेणे चालू आहे. मरकजचा म्होरक्या मौलाना साद हा पळून गेला असून अद्याप बेपत्ता आहे. अनेक प्रतिनिधी हे मशिदीत वा अज्ञात स्थळी लपून बसले आहेत. इथे कोणत्या समाजास लक्ष्य करण्याचा मुद्दा नाही, तर देशाचा कायदा मोडणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचा मुद्दा आहे. परंतु मरकजमधील प्रतिनिधी कोणत्या कारस्थानाचा जर भाग नसतील तर आजही त्यातील काही जण अज्ञातवासात का बरे आहेत?

मरकजमधील बाधित रुग्णांना रुग्णालयांमध्ये दाखल केले आहे, परंतु तेथेही त्यांनी डॉक्टर्स व परिचारिकांबरोबर असभ्य वर्तन केले आणि काही जण रुग्णालयातून पळूनही गेले. ज्या वस्त्यांमध्ये काही प्रतिनिधी लपल्याची माहिती आहे तेथे शोधमोहिमेसाठी गेलेल्या पोलिसांवर दगडफेक करण्याच्या घटनाही इंदूर, पाटणा व देशातील अन्य काही भागांतही झाल्याचे वृत्त आहे.

केंद्र व राज्य सरकारे आणि पोलिसांनी आवाहन करूनही मरकज प्रतिनिधी लपून राहिले आहेत म्हणून संशयाची सुई त्यांच्याकडे झुकते. लपलेल्या प्रतिनिधींनी स्वत:हून पोलिसांच्या स्वाधीन झाले पाहिजे यातच त्यांचे स्वत:चे, त्यांच्या कुटुंबीयांचे व देशातील नागरिकांच्या आरोग्याचे हित आहे.

लेखक ‘रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी’ या संस्थेचे महासंचालक आहेत.

ईमेल : ravisathe64@gmail.com

[संपादनाविषयी टीप : देवबंद, तबलीग, तबलीगी या शब्दांचे लेखन, लेखकाने पाठविलेल्या मूळ खडर्य़ानुसारच ‘देवबंध’, ‘तबलीघ’, ‘तबलीघी’ असे या मजकुरापुरते जसेच्या तसे ठेवण्यात आलेले आहे.]