रविवार, १२ नोव्हेंबर रोजी बी. व्ही. जोंधळे यांचा ‘बौद्ध धर्म व आक्रमक इस्लामी : दुसरी बाजू’ हा लेख प्रसिद्ध झाला आहे. माझ्या ५ नोव्हेंबर रोजी प्रकाशित झालेल्या मूळ लेखास प्रतिवाद करणारा सदर लेख आहे. हा लेख वाचल्यानंतर असे लक्षात येते की, मी मूळ लेखात पुराव्यासहित उपस्थित केलेल्या मुद्दय़ांना ताíकक उत्तरे जोंधळे यांच्या लेखात नाहीत. त्यांच्या लेखात पुरावे नगण्य व पूर्वग्रहदूषित मते अधिक दिसतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
जोंधळे यांनी उपस्थित केलेले मुद्दे व त्यांचे निष्कर्ष पुढीलप्रमाणे..
१. इस्लामी आक्रमणामुळे बौद्ध धर्म लोप पावला हे अर्धसत्य आहे.
२. साठे यांनी हा लेख बुद्ध धर्माच्या प्रेमापोटी नव्हे, तर इस्लामच्या द्वेषापोटी लिहिला आहे.
३. इस्लाम समतावादी आहे व इस्लामने समता कुठे नाकारली?
४. लेखाचा उद्देश बौद्ध व मुस्लीम समाजांत दुरावा निर्माण करणे वगरे.
५. केंद्र सरकार बुद्ध धर्माला राजाश्रय मिळवून देईल काय?
पं. नेहरूंच्या काळापासूनच इथला खरा इतिहास लपविण्याचे धोरण चालू आहे. या देशातील नागरिकांना खरा इतिहास जर कळणार असेल तर त्यात वावगे ते काय? इतिहासातील मढी उकरून काढण्याचा इथे प्रश्नच उद्भवत नाही. येथील सवर्णानी दलित समाजाची उपेक्षा केली, त्यावर अन्याय केला हा सत्य इतिहास आहे. तसेच इस्लामच्या आक्रमणामुळे बौद्ध धर्माचा लोप झाला हेही वास्तव जनतेपुढे आले तर त्यास आक्षेप का?
सरकारांच्या कृपेने एनसीईआरटी, आयसीएचआर, यूजीसीसारख्या संस्थांमध्ये गेली तीन दशके मार्क्सवादी मंडळी मोठय़ा जागा अडवून होती. आपल्या अधिकाराचा वापर करून शैक्षणिक अभ्यासक्रमातून आजपर्यंत जी माहिती या मंडळींनी खपविली आहे, ती वरवर पाहिली तरी भारताच्या इतिहासाशी त्यांनी चालवलेला राजकीय खेळ लगेच समजेल.
नेहरू गझनीबद्दल लिहितात.. ‘गझनीने मथुरेचे मंदिर पाहिले. त्याला ते बांधकामाचे एक आश्चर्य वाटले. त्याने त्याची स्तुती केली. भक्तांच्या श्रद्धेइतके भक्कम व सुंदर हजार इमले येथे आहेत. हे सर्व काम पूर्ण होण्यासाठी निदान २०० वर्षे तरी लागली असतील. लक्षावधी दिनार खर्च झाले असतील.’ नेहरूंच्या वर्णनापाशी थांबायचे तर गझनी हा आक्रमक नव्हता, तर तो कलाकृतीचा उपासक होता असेच मानावे लागेल. व्हिन्सेंट स्मिथ हे इतिहासकार आपल्या ‘हिस्टरी ऑफ इंडिया’ या ग्रंथात लिहितात की, ‘मुहम्मद गझनीची नंतरची धाड मथुरेतल्या पवित्र कृष्ण मंदिरावर पडली.. मूर्तीपैकी पाच मूर्ती तळपत्या सुवर्णाच्या होत्या. पाच-पाच यार्ड उंचीच्या मूर्तीच्या डोळ्यांच्या जागी अमूल्ये रत्ने होती. ही सगळी मंदिरे नाफ्ता ओतून भस्मसात करावीत, असा आदेश गझनीने त्याच्या सनिकांना दिला (पृष्ठ क्र. २०७)
एम. एन. रॉय ‘रोल ऑफ इस्लाम’ या पुस्तकात लिहितात की, हिंदू समाजातील विषमतेला कंटाळून खालच्या जातींनी इस्लामला कवटाळले. रॉय यांच्या मते इस्लाममध्ये समता होती. अर्थात मुस्लीम आक्रमकांनी भारतात अनन्वित अत्याचार केले हा भाग इथे गौण ठरतो. कारण एक प्रकारे इस्लामने अत्याचार करून अत्याचार करणाऱ्यांना अत्याचाराचा खरा अर्थच शिकवला होता. अत्याचार करताना खालच्या जातींना वगळले गेले असे सर्वानी येथे गृहीत धरावे. इस्लाममध्ये समता आहे वा होती असे लिहिणे खरे तर वावदूकपणाचे आहे. कारण मुस्लीम आक्रमक जेथे जेथे जात तेथील एक तर हजारो निरपराधांना ते ठार करीत. त्यांच्या मुंडक्यांच्या राशी रचीत, कत्तल करून झाली की तेथील स्त्री-पुरुष, बालकांना इस्लामची दीक्षा देत. त्यानंतर देशोदेशीच्या गुलामांच्या बाजारात त्यांची विक्री करीत. तसे कागदोपत्री उल्लेख आहेत. या वर्तनाला समतेचे दर्शन म्हणावयाचे काय?
इस्लामच्या आक्रमणाच्या १३ शतके आधी भारतात बुद्ध धर्म होता. अनेकांच्या मते हा धर्म समतावादी होता. असे असूनही येथील खालच्या जातींनी समतेच्या ओढीने बौद्ध धर्माचा स्वीकार का केला नाही? हाही एक संशोधनाचा विषय आहे. ‘पाकिस्तान ऑर पार्टशिन ऑफ इंडिया’ या आपल्या सुप्रसिद्ध ग्रंथात बाबासाहेबांनी या विषयावर एक पूर्ण प्रकरण लिहिले आहे. त्या प्रकरणाचे नाव आहे सोशल स्टॅग्नेशन. या प्रकरणाच्या पहिल्या पानावरचे त्यांचे वाक्य असे आहे –
‘‘केवळ हिंदूंत सामाजिक वैगुण्ये आहेत आणि मुस्लिमांत नाहीत हा भ्रम आहे, असा कोणता सामाजिक दुर्गुण आहे जो हिंदूंत आहे आणि मुस्लिमांत नाही.’’ (प्रकरण ८, पृष्ठ क्र. ८-२२५)
बालविवाह इत्यादी सामाजिक दुर्गुण हिंदू आणि मुस्लीम अशा दोघांतही आहेत हे त्यांनी सांख्यिकी आधाराने दाखवले आहे. इस्लाम धर्मातील विषमता, गुलामी आणि जातिव्यवस्था याबद्दल बाबासाहेब लिहितात – ‘‘इस्लाम बंधुत्वाची भाषा करतो. सर्वाना वाटते की जणू इस्लाममध्ये गुलामी नाही.. आज गुलामी जगभरातून गेली असली तरी जेव्हा गुलामी होती तेव्हा तिच्या समर्थनाचा प्रारंभ इस्लाम धर्म आणि इस्लामिक देशांतून झाला होता.’’ (८-२२८)
इस्लाम धर्मात गुलामी आणि विषमतेची मुळे आहेत यावर चर्चा करताना आंबेडकर म्हणतात, ‘‘गुलामांना माणुसकीने वागवा असे प्रेषित कुराणात म्हणतो, पण त्यांना मुक्त करा असे म्हणत नाही. इस्लाम धर्मानुसार गुलामांना मुक्त करण्याचे बंधन मुस्लिमांवर नाही. गुलामाला चांगले वागवत (!) गुलाम ठेवणे हा उल्लेख आंबेडकरांनी जाणीवपूर्वक केला आहे. धर्मातील विषमता ही वेगवेगळी रूपे घेत टिकून राहते. इस्लाम धर्मात गुलामी असल्याने ती विषमतेच्या रूपाने टिकून राहिली आहे, हे दाखवून देत बाबासाहेबांनी मुस्लिमांतील जातींचे भले मोठे कोष्टक पानभर दिले आहे. (८-२२९)
सर्व धर्माची चिकित्सा करून झाल्यावर बाबासाहेबांना बुद्धाचा मार्ग योग्य वाटला होता. बुद्ध धर्माचा ऐतिहासिक उदय आणि अस्ताची त्यांनी तपशीलवार मीमांसा केली आहे. अनेक ठिकाणी त्याची वेगवेगळी कारणे दिली आहेत. माझे सर्वात शेवटचे मत प्रमाण मानावे असे त्यांनी अनेकदा आपल्या अनुयायांना निक्षून सांगितले आहे. या विषयावर त्यांनी सर्वात शेवटी २३ जून १९५६ रोजी भाषण दिले. अखिल भारतीय बौद्धजन समितीच्या दिल्लीतल्या सभेत ते म्हणाले – ‘‘मुसलमानांनी या देशावर आक्रमण करून बौद्ध विहारांचा नाश करून, बौद्ध मूर्ती फोडल्यामुळे त्यांना बूत शिकन म्हणजे मूर्ती फोडणारे असे म्हटले जाते. बूत हा मूर्तीसाठीचा शब्द म्हणजे बुद्ध या शब्दाचे (अपभ्रंश) रूप आहे.
मुसलमानांनी बौद्ध व हिंदू धर्मावर आक्रमण केले होते. दोघांची मंदिरे उद्ध्वस्त केली होती. बऱ्याच बौद्ध भिक्खूंची कत्तल झाली आणि काहींनी देशाटन केले. त्यामुळे बौद्ध अनुयायांना आपण कोणाचे अनुकरण करावे हेच कळेनासे झाले. बौद्ध अनुयायी अंधकारात चाचपडत राहिले.’’ (खंड १८-३, पृष्ठ- ४८०, ४८१)
एलिनॉर झेलिऑट हे बुद्ध धर्माचे एक मान्यताप्राप्त अभ्यासक आहेत. त्यांनी ‘आंबेडकर्स कन्व्हर्जन’ हे पुस्तक लिहिले आहे. बाबासाहेबांनी धर्मातराची घोषणा केली त्या वेळी ख्रिस्ती मिशनरी व मुल्लामौलवी त्यांना भेटावयास गेले होते. आंबडेकरांच्या अनुयायांनी ख्रिस्ती व इस्लाम धर्म स्वीकारावा त्यासाठी ते आग्रही होते. मात्र बाबासाहेबांनी त्यांचे प्रस्ताव अमान्य केले, हे झेलिऑट यांनी साधार दाखवून दिले आहे. अशाच प्रकारचे उल्लेख धनंजय कीर यांनी बाबासाहेब आंबेडकरांवर लिहिलेल्या चरित्रात पृष्ठ क्र. २८४-२८५ वर आढळतात.
चां. भ. खैरमोडे यांनी बाबासाहेब आंबेडकरांवर चरित्र खंड लिहिला आहे. महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाने तो प्रकाशित करण्यास मदत केली. त्याच्या बाराव्या खंडात पृष्ठ ४४-४५ वर दिल्लीत झालेल्या बठकीत सोहनलाल शास्त्री यांच्यासमवेत बाबासाहेबांचा बौद्ध धर्म दीक्षेविषयी संवाद आहे. शास्त्री विचारतात, ‘‘बाबासाहेब! बौद्ध धर्मापेक्षा ख्रिस्ती किंवा इस्लामी धर्म आपणाला जास्त फायदेशीर होणार नाही का?’’ बाबासाहेब त्यावर म्हणतात, ‘‘ते धर्म आपणाला फायदेशीर कदाचित होतील, पण ते भारतात निर्माण झालेले धर्म नाहीत. त्या धर्माचा आपण स्वीकार केला तर आपणाला इतर देशांतून, आपल्या लोकांच्या भौतिक उन्नतीकरिता खूप पसाही मिळेल. आपणाला भारतीय राजकारणात खूप बळही कमावता येईल. पण या सर्व गोष्टी परस्वाधीन होऊन आपणाला करता येतील. दुसऱ्यांच्या ओंजळीने दुसऱ्यांचे पाणी पिऊन आपल्या सर्वागीण प्रगतीची तहान भागविणे हा पुरुषार्थ नव्हे. स्वतच्या हिमतीने, स्वावलंबनाने व स्वाभिमानाने आणि स्वदेशी नव्या धर्माच्या आश्रयाने आपण आपली प्रगती केली तर तो खरा पुरुषार्थ ठरेल. आणि भारतीय इतिहासात आपला पुरुषार्थ सोनेरी अक्षरांनी लिहिला जाईल. ख्रिस्ती अगर इस्लामी धर्मानी आपली भारतीय संस्कृती नष्ट होईल. आणि जातिवंत संस्कृती राखणे हे बौद्ध धर्माचे रहस्य आहे. हे ज्यांना उमगेल तेच माझ्या धर्मदीक्षेबद्दल मनात किंतु बाळगणार नाहीत. बौद्ध संस्कृतीचे पुनरुज्जीवन करणे व सर्व भारत बौद्ध करणे हे माझे उद्दिष्ट आहे.’’
बौद्ध धर्म हा भारताशिवाय अन्य देशांतही पसरला होता. तिथेही त्याचा नाश झाला. हा नाशही हिंदूंनीच केला, असे रोमिला थापर यांच्या सिद्धांताप्रमाणे मानावयाचे का?
सम्राट अशोक सोडून भारतातील कोणत्याही राजाने धर्मास राजाश्रय मिळवून दिलेला नाही. धर्म व राज्य या संकल्पना वेगळ्या असून युरोपप्रमाणे इथे राजसत्ता आणि धर्मसत्ता यामध्ये कधीच संघर्ष झाला नाही.
भारतीय संस्कृतीने द्वैत, अद्वैत, विशिष्टाद्वैत, ईश्वरी तत्त्व सगुण आहे, ते निर्गुण आहे, देव आहे, देव नाही (चार्वाक, बुद्ध), वेद हे अर्थहीन आहेत (कौत्स निरुक्त), बौद्ध व जैन मते अशी सर्व प्रकारची उलट-सुलट व काही परस्परविरोधी मते सामावून घेतली आहेत. ‘कास्ट अॅण्ड क्लास’ या आपल्या ग्रंथामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, या देशामध्ये असंख्य जाती असल्या तरी त्यांच्यामध्ये खोलवर सांस्कृतिक एकता रुजली आहे. गौतम बुद्ध आणि हिंदू धर्म या दोघांमध्ये मूलभूत फरक फारच थोडा आहे हे आनंद कुमारस्वामी व ओल्डनबर्ग या संशोधकांनी दाखवून दिले आहे. महास्थविर चंद्रमणी आणि इतर भिक्खू यांनी धर्मातराच्या दीक्षा समारंभाच्या वेळी जे पत्रक प्रसिद्ध केले त्यात हिंदू धर्म आणि बौद्ध धर्म या एकाचा वृक्षाच्या दोन फांद्या आहेत, असे म्हटले होते. (पृष्ठ क्र. ५६०) माझ्या लेखातील विषयांची दुसरी बाजू कोणती हे जोंधळे यांचा लेख वाचल्यानंतर शेवटपर्यंत कळत नाही. एक तर जोंधळे यांचा वैचारिक गोंधळ तरी आहे किंवा सत्य पचवता येत नसल्यामुळे इतर मुद्दय़ांना नाहकपणे उपस्थित करून वाचकांची दिशाभूल करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे, हे यातून सिद्ध होते.
रवींद्र माधव साठे
ravisathe64@gmail.com
लेखक रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक आहेत.