’२६ जुलैच्या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसलेल्या शहरांमध्ये प्रामुख्याने बदलापूरचा उल्लेख करावा लागेल. संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे रौद्ररूप धारण केलेल्या उल्हास नदीने शहरातील किनाऱ्यालगतच्या काँक्रीटच्या जंगलात अगदी आतपर्यंत मुसंडी मारली होती. बदलापूर शहरातील काही भागांचा संपर्कच या पुरामुळे तुटला होता.
’ इमारतीच्या पहिल्या माळ्यापर्यंत पाण्याची मजल गेली होती. पुराच्या या दहशतीमुळे त्या वेळी नुकताच बहरू पाहत असलेल्या येथील बांधकाम व्यवसायाला खीळ बसली होती. मात्र दोन वर्षांतच हे दु:स्वप्न लोक विसरले. पुन्हा बदलापूर शहर हातपाय पसरू लागले. आता तर ते चौथ्या मुंबईचे एक महत्त्वाचे केंद्र आहे.
’वाढते अतिक्रमण आणि प्रदूषण यामुळे गटार झालेला अंबरनाथ तालुक्यातील वालधुनीचा प्रवाह पूर्ववत करण्यात अद्याप तरी संबंधित यंत्रणांना अपयश आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Badlapur stratergy fail