‘फ्री प्रेस जर्नल’मधून बाळासाहेब बाहेर पडले आणि राजकीय व्यंगचित्रांवर आधारित ‘शंकर्स विकली’ या दिल्लीहून निघणाऱ्या नियतकालिकाच्या धर्तीवर मुंबईत प्रयोग करायचा असं बाळासाहेबांनी ठरवलं. प्रबोधनकारांकडे त्यांनी हा विषय मांडताच होकार तर मिळालाच शिवाय प्रबोधनकारांनी साप्ताहिकाला नावही दिलं..‘मार्मिक’. १३ ऑगस्ट १९६० रोजी ‘मार्मिक’ सुरू झालं आणि पाहता पाहता त्याने मराठी मनाचा कब्जा घेतला.
’ बाळासाहेबांचे दौरे, भाषणं सुरू झाली. ते पाहून एके दिवशी प्रबोधनकारांनी बाळासाहेबांना संघटना काढण्यास सांगितलं आणि नावही देऊन टाकलं ‘शिवसेना’.

’ ‘मार्मिक’च्या पाच जून १९६६ च्या अंकात शिवसेनेच्या स्थापनेबाबतची चौकट छापून आली. १९ जून १९६६ रोजी शिवसेनेची स्थापना झाली. दसऱ्याच्या मुहूर्तावर ३० ऑक्टोबर १९६६ रोजी शिवसेनेचा पहिला मेळावा होणार असल्याचं ‘मार्मिक’मध्ये जाहीर झालं. ‘शिवाजी पार्क’वर सभा घ्यायची असं बाळासाहेबांनी ठरवलं. पण काही बुजुर्ग मंडळींनी पुरेशी उपस्थिती नसली तर पहिल्याच सभेचा बार फुसका ठरेल अशी शंका व्यक्त करत बंदिस्त सभागृहात पहिली बैठक घ्यायची सूचना केली. पण बाळासाहेब ठाम राहिले. सभेच्या दिवशी दुपारपासूनच ढोल-ताशे, लेझिमच्या तालावर पावलं टाकत मराठी माणूस शिवाजी पार्कवर गर्दी करू लागला. सायंकाळपर्यंत मैदान गर्दीने फुलून गेले. प्रबोधनकारांनी ‘ठाकरे कुटुंबाचा बाळ या महाराष्ट्राला आज अर्पण करत आहे’ असे जाहीर केलं आणि महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर ‘शिवसेना’ आणि ‘बाळासाहेब ठाकरे’ या दोन नव्या शक्तींचा उदय झाला.

Rahul Narwekar
Rahul Narwekar : संख्याबळ नाही तरीही मविआला विरोधी पक्षनेतेपद देणार का? राहुल नार्वेकरांनी स्पष्टच सांगितलं
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Nitin Gadkari on Omraje Nimbalkar
Maharashtra News Highlights : “ताजमहल लवकर बांधून झाला पण..”, ठाकरेंच्या खासदाराचा संसदेत मराठीत प्रश्न, नितीन गडकरींनी दिले ‘असे’ उत्तर
Jyotiraditya Scindia lady killer said Kalyan Banerjee
“सिंधिया लेडी किलर”, तृणमूलचे खासदार असं का म्हणाले? केंद्रीय मंत्र्याचंही जशास तसं प्रत्युत्तर
jayant patil rahul narvekar
Video: “राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालावर सर्वोच्च न्यायालय अजून विचार करतंय”, जयंत पाटील यांची टोलेबाजी!
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!
What Devendra Fadnavis Said About Rahul Narwekar ?
Devendra Fadnavis : “राहुल नार्वेकर पुन्हा येईन म्हणाले नव्हते तरीही पुन्हा आले..”, देवेंद्र फडणवीस यांचं खुमासदार भाषण
pune pustak Mahotsav latest news
‘लिटफेस्ट’च आता ग्रंथतारक…

’ मुंबई महानगरपालिकेच्या १९६८ च्या निवडणुकीत शिवसेनेने मधु दंडवते यांच्या प्रजा समाजवादी पक्षाशी युती केली आणि शिवसेनेने ४० जागा जिंकल्या. डॉ. हेमचंद्र गुप्ते यांना शिवसेनेचा पहिला महापौर होण्याचा मान मिळाला.

’ फेब्रुवारी १९६८ च्या ‘मार्मिक’मध्ये बाळासाहेबांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर जळजळीत अग्रलेख लिहिला आणि त्याचवर्षी नोव्हेंबरमध्ये ते बेळगावला गेले. परत आल्यावर त्यांनी इशारा दिला, ‘निश्चित कालमर्यादेत केंद्राने सीमाप्रश्न सोडवला नाही तर केंद्रीय मंत्र्यांना, काँग्रेस पुढाऱ्यांना मुंबईत प्रवेश नाही’. त्यातून आधी यशवंतराव चव्हाणांची आणि नंतर १९६९ मध्ये केंद्रीय अर्थमंत्री मोरारजी देसाई यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न झाला. मोरारजींनी आंदोलकांवरून गाडी पुढे दामटण्यास चालकाला सांगितलं. त्यातून आंदोलन सुरू झालं व मुंबई पेटली. पोलिसांच्या गोळीबारात तब्बल ५२ माणसं मृत्युमुखी पडली. आंदोलन दडपण्यासाठी बाळासाहेबांना अटक झाली. ही त्यांच्या आयुष्यातील पहिली अटक. यातूनच शिवसेना स्टाईल ‘मुंबई बंद’ सुरू झाला.

बाळासाहेब जेव्हा आर. के. लक्ष्मणना भेटतात..

’ १९६७ च्या डिसेंबरमध्ये परळच्या दळवी बिल्डिंगवरील हल्ल्याच्या घटनेपासून शिवसेना-साम्यवादी संघर्ष चिघळला होता. १९७० च्या जूनमध्ये साम्यवादी आमदार कृष्णा देसाईंचा खून झाला. कृष्णा देसाईंच्या निधनामुळे परळला पोटनिवडणूक झाली आणि सेनेचे वामनराव महाडिक विधानसभेवर निवडून गेले.

’ सप्टेंबर १९७३ मध्ये महाराष्ट्र सरकारच्या उद्योग संचालनालयाने स्थानिक भूमिपुत्रांना सर्व श्रेणींत नोकऱ्या दिल्या पाहिजेत असा आदेश काढला. हा सेनेचा विजय होता.

’ ठाण्याच्या एका प्रचारसभेत श्रोत्यांमधून बाळासाहेबांना एक चिठ्ठी आली. ‘शिवसेनेच्या हाती सत्ता दिल्यास ठाणेकरांसाठी एक नाटय़गृह मिळेल काय?. बाळासाहेबांनी भाषणात जाहीर केलं, ‘तुम्ही आम्हाला सत्ता द्या, मी तुम्हाला नाटय़गृह देतो’. गडकरी रंगायतन आणि दादोजी कोंडदेव स्टेडियम ही बाळासाहेबांच्या वचनपूर्तीची दोन उदाहरणे आहेत.

’ १९७५ मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी जाहीर केली, तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यास पाठींबा दिला.
’ १९७७ मध्ये शिवसेना भवन ही वास्तू उभी राहिली.

’ शिवसेनेचं पहिलंवहिलं अधिवेशन १९८१ मध्ये शिवाजी पार्कजवळच्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात झालं. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते थोर साम्यवादी नेते श्रीपाद अमृत डांगे.

हाफिज सईदला बाळासाहेब ठाकरेंना धडा शिकवायचा होता- हेडली

’  १९७५ ते १९८५ हा कालखंड शिवसेनेला बिकट गेला. अशात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या. मुख्यमंत्री वसंतदादा पाटील म्हणाले, ‘महाराष्ट्रात मुंबई आहे, पण मुंबईत महाराष्ट्र नाही.’ वातावरण तापलं आणि शिवसेनेला महानगरपालिका निवडणुकीत घवघवीत यश मिळालं.

’ पाल्र्याच्या निवडणुकीत बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा नारा दिला आणि पुढे त्यातूनच भाजपने शिवसेनेशी युती केली. १९८९ च्या लोकसभा निवडणुकीत युतीचे १४ खासदार निवडून आले. १९९० च्या विधानसभा निवडणुकीत युतीचे ९४ आमदार निवडून आले.

’ वृत्तपत्रांमधून होणाऱ्या टीकेला उत्तर देण्यासाठी २३ जानेवारी १९८९ रोजी ‘सामना’ सुरू झाला.

’ विरोधी पक्षनेतेपदी डावलले गेल्याने डिसेंबर १९९१ मध्ये छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडली. शिवसेनेतलं पहिलं बंड.

’  सहा डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद पडली. मुंबईत दंगली सुरू झाल्या. सहा जानेवारी १९९३ ला पुन्हा दंगली सुरू झाल्या. शिवसैनिक रस्त्यावर उतरले.

’ १९९५ च्या विधानसभा निवडणुका लागल्या. बाळासाहेबांनी महाराष्ट्रभर झंझावाती दौरा केला. १९९० मध्ये हुकलेली संधी शिवसेना-भाजपा युतीने साधली. महाराष्ट्रात युतीची सत्ता आली. शिवाजी पार्कवर मुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला.

’ बाळासाहेबांनी अमेरिकेच्या निमित्ताने एकदाच परदेशाचा दौरा केला. त्यावेळी तिथले रस्ते, उड्डाणपूल पाहून आपल्याकडेही अशा पायाभूत सुविधा असाव्यात अशी त्यांची इच्छा होती. बाळासाहेबांनी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाची योजना युती सरकारला हाती घ्यायला लावली. त्यांच्याच विचारातून मुंबईत उड्डाणपुलांची मालिकाही उभी राहिली.

सिनेमाच्या जगातील बाळासाहेब

’ जुलै १९९९ मध्ये युतीचं सरकार सत्तेवर असताना केंद्रीय निवडणूक आयोगाने बाळासाहेबांचा मतदानाचा अधिकार सहा वर्षांसाठी काढून घेतला. नंतर २००७ मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत बाळासाहेबांनी दीर्घकालावधीनंतर मतदान केलं.

’ १९९९ मध्ये युतीचं सरकार गेलं आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचं सरकार आलं. जुलै २००० मध्ये उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री छगन भुजबळ यांनी १९९२-९३ या कालावधीतील ‘सामना’मधील अग्रलेखांमुळे दंगल पेटल्याचा ठपका ठेवत बाळासाहेबांना अटक करण्याचा निर्णय घेतला. तीन दिवस मुंबईत तणाव होता. नंतर बाळासाहेब आपणहून न्यायालयात हजर झाले, पण प्रत्यक्षात न्यायाधीशांनी खटलाच फेटाळला व अटकेची वेळच आली नाही.

’ २००२ मध्ये मुंबई महानगरपालिका निवडणुकीची सूत्रे बाळासाहेबांनी पुत्र उद्धव ठाकरे यांच्यावर सोपवली. महानगरपालिका निवडणुकीत यश मिळाल्यानंतर २००३ मध्ये महाबळेश्वर येथील अधिवेशनात उद्धव ठाकरे यांची शिवसेनेचे कार्याध्यक्ष म्हणून निवड झाली. राज-उद्धव, उद्धव-नारायण राणे यांच्यातील शीतयुद्ध सुरू झाले.

हळवा ‘हृदयसम्राट’!

’ जुलै २००५ मध्ये शिवसेनेला व बाळासाहेबांना हादरवून सोडणारे आणखी एक बंड झालं. नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या निकटवर्तीयांवर तोफ डागली आणि त्यांना शिवसेना सोडावी लागली.

’ राणे यांच्या बंडाची झळ शिवसेनेला बसत असतानाच जानेवारी २००६ मध्ये खुद्द ठाकरे कुटुंबात ठिणगी पडली. राज ठाकरे यांनी उद्धव व त्यांच्या आसपासच्या मंडळींवर हल्लाबोल करत शिवसेना सोडली व बाळासाहेबांना एक मोठा धक्का बसला.

’ नारायण राणे व राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली आणि शिवसेनेने ती जिंकली. बाळासाहेबांची शिवसेना व मुंबईवरील पकड पुन्हा सिद्ध झाली.

Story img Loader