‘इंडिया टुडे’च्या इंग्रजी वेबसाइटवर १५ जून २०१२ रोजी एक वृत्तलेख झळकला, तो हा.. जसाच्या तसा मराठीत. भिंद्रनवाले किंवा इंदिरा गांधींचे मारेकरी यांना मोठे करण्याचे काही गटांचे प्रयत्न कसे पद्धतशीरपणे सुरू आहेत, याची इशाराघंटाच चार महिन्यांपूर्वी वाजली होती..
अमृतसरच्या सुवर्णमंदिरात दरवर्षी ६ जून हा दिवस ऑपरेशन ब्ल्यू स्टार कारवाईत बळी पडलेल्यांचे स्मरण करण्यासाठी पाळण्यात येतो.
‘घल्लुघारा दिवस’ असे या दिवसाला संबोधतात आणि यंदा त्या दिवशी जवळपास तीन हजार शीख महिला-पुरुष सुवर्णमंदिरात जमले होते. दरवर्षी हा स्मरणदिन पाळण्यात येत असला तरी या वर्षीचे महत्त्व अधिक प्रकर्षांने जाणवत होते.
जून १९८४ मध्ये सुवर्णमंदिरात लष्कर घुसवून करण्यात आलेल्या कारवाईत संत जर्नेलसिंग भिंद्रनवाले आणि त्यांचे साथीदार मारले गेले त्यांच्या स्मरणार्थ उभारण्यात येणाऱ्या स्मृतिभवनाचा पायाभरणी समारंभ शिखांच्या पाच उच्चपदस्थ धर्मगुरूंच्या हस्ते करण्यात आला. सुवर्णमंदिरातील गाभारा असलेले हरिमंदिर साहिब आणि अकाल तख्त यांच्या मध्ये ३० बाय ३० फूट जागेवर हे तीन मजली स्मृतिभवन उभारण्यात येणार आहे.
पृथ्वीच्या या अत्यंत मौल्यवान तुकडय़ासाठी शिखांनी आपले रक्त सांडले आहे, असे अखिल भारतीय शीख विद्यार्थी संघटनेचे प्रमुख भाई अमरिक सिंग यांचे पुत्र तरलोचन सिंग यांनी म्हटले आहे. भिंद्रनवाले यांच्यासमवेत अमरिक सिंग त्या कारवाईत शहीद झाले. तरलोचन सिंग हे मुक्तसर येथील भुट्टिवाला येथे शासकीय शाळेत शिक्षक आहेत तर भिंद्रनवाले यांचे पुत्र इशर सिंग हे जालंधर येथील मालमत्ता दलाल आहेत. सध्या या दोघांकडे हीरो म्हणून पाहिले जात आहे.
सुवर्णमंदिरात वार्षिक स्मरणदिनी सकाळी अकाल तख्त जथेदार गुरबचन सिंग यांनी तरलोचन आणि इशर सिंग यांचा शाल आणि सिरोपा देऊन सत्कार केला. त्यांच्यासमवेत अमरिक सिंग यांच्या पत्नी गुरमित कौर आणि इंदिरा गांधी हत्याकांडातील आरोपी सतवंत सिंग याच्या वयोवृद्ध मातोश्री पियर कौर यांचाही सन्मान करण्यात आला. पंजाबचे मुख्यमंत्री बियांत सिंग आणि अन्य १७ जणांचे हत्याकांड घडविणारा बब्बर खालसाचा आंतरराष्ट्रीय अतिरेकी बलवंत राजोना याला या वेळी ‘जिंदा शहीद’ अशी उपाधीही बहाल करण्यात आली.
स्मरणदिनाच्या पूर्वसंध्येवर म्हणजेच ५ जून रोजी दल खालसा या फुटीरतावादी अतिरेकी गटानेही भिंद्रनवाले स्मृतिभवन उभारणी कार्यक्रम साजरा केला. त्यांच्यातर्फे ४२२ पानांची शहिदांची दैनंदिनीही त्याच ठिकाणी प्रकाशित करण्यात आली. काश्मीरमधील फुटीरतावादी नेता सैयद अली शाह गिलानी याचा संदेशही लक्षणीयपणे प्रकाशित करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर ब्ल्यू स्टार कारवाईत बळी पडलेल्या २२० अतिरेक्यांची नावेही त्यामध्ये आहेत. संत भिंद्रनवाले यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी स्मृतिभवनाची उभारणी ही मोठी बाब आहे, असे दल खालसाचे सरचिटणीस कनवरपाल सिंग याने म्हटले आहे.
खलिस्तान हेच उद्दिष्ट ठरवून दल खालसा या राजकीय संघटनेचे ६ ऑगस्ट १९९८ रोजी पुनरुज्जीवन करण्यात आले. दल खालसाबद्दल सहानुभूती असलेल्या इंग्लंड, अमेरिका आणि कॅनडातील लोकांकडून निधी जमविण्यात आला आणि गोबेल्स तंत्राला लाजवील, असा प्रचारही करण्यात आला. चर्चासत्रे, स्टिकर्स, भिंद्रनवाले यांचे छायाचित्र असलेले टी-शर्टस् अशा पद्धतीने पंजाबमध्ये भिंद्रनवाले यांच्या स्मृती जपल्या जातील, यासाठी सर्व प्रकारे प्रयत्न करण्यात येणार असल्याचे कनवरपाल सिंग हे निर्भयपणे सांगतात.
सदर स्मृतिभवन उभारण्यामागे ज्या शक्ती आहेत त्यांच्यावर कारवाई करावी, असा सल्ला देणारे पत्र ७ जून रोजी केंद्रीय गृहमंत्रालयाने मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांना पाठविले आहे. स्मृतिभवनाच्या उभारणीमुळे जातीय दुफळी निर्माण होईल, अशी भीती पंजाब काँग्रेसचे प्रमुख कॅ. अमरिंदर सिंग यांनी व्यक्त केली. शिरोमणी अकाली दलासमवेत सत्तेत असलेल्या भाजपने मात्र यावर जास्त भाष्य करणे टाळले आहे. स्मृतिभवन उभारणे अयोग्य आहे, ते टाळता आले तर उचित होईल, इतकेच भाजपने म्हटले आहे. तथापि, पंजाब सरकारच्या अनुमतीविना कोणतेही पाऊल उचलण्यात आलेले नाही, असे पंजाब भाजपच्या अमृतसरमधील फायरब्रॅण्ड नेत्या लक्ष्मीकांता चावला यांनी म्हटले आहे. आपल्याच पक्षाच्या सहकाऱ्यांविरुद्ध आणि सत्तेत सहभागी असलेल्या पक्षाच्या विरोधात त्या आपले म्हणणे सडेतोडपणे मांडतात.
मुख्यमंत्री, त्यांचे पुत्र आणि सूनबाई अतिरेक्यांसाठी क्षमायाचना करतात त्या राज्यात अन्य कसली अपेक्षा करणार, असा स्पष्ट सवालही चावला यांनी केला आहे. भिंद्रनवाले यांचा ज्या पद्धतीने उदो उदो सुरू झाला आहे तो खलिस्तान चळवळ पुन्हा सुरू करण्यामागील घातक कट आहे, असे त्या म्हणतात. कोणतेही स्मृतिभवन उभारण्यापूर्वी देशाने ते कोणाच्या प्रीत्यर्थ उभारले जात आहे हे ठरविण्याची गरज आहे. शेकडो निष्पापांची हत्या करणारा विनाशक शहीद कसा होऊ शकतो, असाही त्यांचा सवाल आहे. मात्र अमृतसरपासून ३० कि.मी. अंतरावर असलेल्या चौक मेहता येथे दमदमी टाकसाळ असून त्यांचे या बाबत भिन्न मत आहे. हरिमंदिर साहिबचे रक्षण करताना जे शहीद झाले त्यांच्या स्मृत्यर्थ हे स्मृतिभवन आहे, असे टाकसाळ प्रमुख बाबा हरनामसिंग खालसा यांचे म्हणणे आहे.
दमदमी टाकसाळ, दल खालसा आणि फेसबुकसारख्या सोशल नेटवर्किंग संकेतस्थळांवर परदेशात स्थायिक असलेल्या खलिस्तानप्रेमींना भिंद्रनवाले यांची, शिखांचा आणि त्यांच्या पवित्र मंदिराचा तारणहार, अशी प्रतिमा तयार करावयाची आहे. भिंद्रनवाले यांच्या आदेशाने एकाही निष्पापाचा बळी घेण्यात आलेला नाही. शिखांच्या विरोधात ज्यांनी कृती केली त्यांना ठार करण्यासाठीच संत भिंद्रनवाले यांचा आदेश होता, असे तरलोचन सिंग यांनी म्हटले आहे.
ऑपरेशन ब्ल्यू स्टार कारवाईनंतर दगडमातीच्या ढिगाऱ्याखालून ४० हून अधिक मृतदेह बाहेर काढण्यात आले त्यामध्ये बहुसंख्य शीख महिला आणि पुरुष होते, असे उदाहरण देऊन चावला यांनी म्हटले आहे की, भीषण रक्तपात संपुष्टात आला त्यापूर्वी भिंद्रनवाले यांच्या समर्थक अतिरेक्यांनी आणखी शीख मारले असते आणि त्याच अतिरेक्यांना आता हीरो बनविले जात आहे. सध्याचा शीख युवावर्ग सुशिक्षित असून त्यांना स्वत:ची मते आहेत, असा विश्वासही चावला यांनी व्यक्त केला. भिंद्रनवाले यांचे स्मृतिभवन हे शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीला निधी उभारण्यासाठी साधन ठरेल, ही शक्यता पंजाबचे माजी पोलीसप्रमुख केपीएस गिल यांनी फेटाळून लावली. कोणताही शासकीय अथवा राजकीय प्रतिसाद हा भिंद्रनवाले यांना १९८४ मध्ये रोखण्यात जी चूक झाली त्याच प्रकारचा ठरेल, असेही गिल यांचे म्हणणे आहे. पंजाब शांत आहे असे समजणे ही चूक ठरेल, पंजाब केवळ तात्पुरता शांत आहे, असे कनवरपाल सिंग यांचे म्हणणे आहे.
सुवर्णमंदिरात स्मृतिभवन उभारण्यात येत आहे, याची कल्पना आहे का, असे जुन्या अमृतसरमधील बिल्लू या रिक्षावाल्यास विचारले असता त्याने कचकन ब्रेक दाबला.
ते आगीशी खेळत आहेत, असे हा एरवी हसतमुख असणारा रिक्षाचालक म्हणाला. ऑपरेशन ब्ल्यू स्टारच्या वेळी सर्व सामसूम झाले होते आणि काही दिवस आपल्याला उपाशीच राहावे लागले होते, असे क्षणार्धात निस्तेज झालेल्या चेहऱ्याने बिल्लू सांगत होता.

BJP workers request party seniors that Abdul Sattar should not be minister again
काहीही करा पण मंत्रीपदी सत्तार नको, भाजप कार्यकर्त्यांचे साकडे
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
operation lotus
‘ऑपरेशन लोटस’वरून आरोप-प्रत्यारोप; चंद्रशेखर बावनकुळेंच्या दाव्याचे नाना पटोलेंकडून खंडन
shivsena ubt adv harshal Pradhan
महाराष्ट्र पुढे जाणार तरी कसा?
mahavikas aghadi mla
अन्वयार्थ : आत्मपरीक्षणाऐवजी बहिष्कार‘नाट्य’!
sarva jat dharm ekta manch
बांगलादेशातील हिंदू विरुद्ध अत्याचार मोदी सरकारने रोखावेत, सर्व जाती-धर्म एकता मंचची मागणी
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!
man murder over property dispute, Mumbai ,
मुंबई : मालमत्तेच्या वादातून ३६ वर्षीय व्यक्तीची हत्या, दोघांना अटक
Story img Loader