विधानसभा अध्यक्षांविरुद्ध विरोधकांनी दिलेला अविश्वास प्रस्ताव सभागृहात चर्चेला येण्याआधी सरकारनेच शुक्रवारी अध्यक्षांवर विश्वासदर्शक ठराव मांडला, तो संमतही झाला आणि पुढच्या काही क्षणांतच सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. सरकारच्या या कृतीमुळे विरोधक आणि सरकार यांच्यातील विसंवादाची दरी आणखी रुंदावली. अधिवेशनात सरकारने संसदीय संकेत पायदळी तुडविले, लोकशाहीचा खून केला, अशी टीका करीत विरोधकांनी सरकारला धारेवर धरले, तर विरोधकांवर राजकीय कुरघोडी केल्याचा आनंद सत्ताधाऱ्यांमध्ये उमटला. अशा वातावरणामुळे, एकूणच विधिमंडळ अधिवेशनातील कामकाजाबद्दल जनतेच्या मनातही अनेक प्रश्नचिन्हे उमटली. सभागृहाचे कामकाज अनेकदा चर्चेविना गोंधळातच उरकले जाते, बऱ्याचदा गोंधळामुळे तहकूब केले जाते. त्यामुळे राजकीय कुरघोडीचा आखाडा म्हणूनच अधिवेशने भरविली जातात की काय, असा प्रश्न सामान्य जनतेच्या मनात सतत घर करून राहिलेला असतो. जनतेचे प्रतिनिधी म्हणून सभागृहांत बसणाऱ्यांना याबद्दल काय वाटते, लोकप्रतिनिधी म्हणून आपल्यावर असलेल्या जबाबदाऱ्या पार पाडल्याचे समाधान त्यांना मिळते का, याचा शोध घेण्याचा एक प्रयत्न..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा