अर्थसंकल्प अपेक्षा
विमा आणि बँकिंग विभाग व्यापक करण्याची गरज
डीटीसी अर्थात प्रत्यक्ष करसंहिता व जीएसटी म्हणजेच वस्तू व सेवा कर हे दोन्ही गेल्या अनेक वर्षांपासून
यातच अधिक म्हणजे, सार्वजनिक उपक्रम (पीएसयू) हे बिगर धोरणात्मक व्यापारविषयक उपक्रमात गुंतलेले आहे. ते मुक्त स्पध्रेसाठी उघड झाले पाहिजेत आणि मर्यादा -जसे की कामगार कायद्यातील बंधने आणि राजकीय नेमणुका कमीत कमी केल्या पाहिजेत. पीएसयूचे व्यावसायिकतेत रूपांतर करणे अत्यावश्यक आहे , जिथे अशा वस्तू वसुलीच्या ताळेबंदात एक मोठे आणि पुनरुक्त दायित्व बनते. प्रत्येक बिगर धोरणात्मक पीएसयू/ खासगी स्वतंत्र वस्तूला बाजारात तिच्या उत्पादनाच्या आणि सेवेच्या किमतीच्या आणि गुणवत्तेच्या जोरावर स्वत:चे समर्थन करता आले पाहिजे. केवळ स्पध्रेपासून राजकीय सुरक्षा मिळविणे किंवा भांडवल म्हणून सार्वजनिक पसा ओतणे असे होता कामा नये. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये असणारा २.७ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक असणारा बुडित कर्जाचा हिस्सा हा शेवटी भारतीयांकडूनच भरला जाईल. खरे पाहता सार्वजनिक क्षेत्रातील उपलब्ध स्वाधीनता आणि शक्तीची मक्तेदारी जबाबदारीच्या अभावाशी जोडले गेले आहेत. त्यामुळे अनुकंपनीय निर्णय घेण्याला, संथ अंमलबजावणीला आणि गैरव्यवहाराला प्रोत्साहन दिले जाते. या कारणामुळे मौल्यवान सार्वजनिक संपत्तीचा नाश होतो. ही संपत्ती दुसऱ्या चांगल्या उत्पादित कारणांमध्ये वापरता आली असती. अर्थव्यवस्थेत निवृत्तिवेतन विभागाची सुधारणा आणि विमा व बँकिंग विभाग अधिक व्यापक करण्याची क्रिया प्रलंबित आहेत. या क्षेत्रातील थेट विदेशी गुंतवणूक वाढविणे आवश्यक आहे. प्रविष्टी परवान्यांमध्ये पारदर्शकता, उद्देशात्मकता आली पाहिजे आणि ते एखाद्या खुल्या खिडकीच्या स्वरूपात उपलब्ध झाले पाहिजेत. रोखे बाजाराचे चलन आणि डेरिव्हेटिव्ह बाजारात उदारीकरण आणि एकत्रिकरण करून कर्जदार आणि कर्ज देणारे यांच्यात स्पर्धा करणेसुद्धा आवश्यक आहे. यातच पुढे अजून आधुनिक वातावरणाच्या गरजा भागविण्यासाठी चालू आíथक नियामक आरेखकाची (आíकटेक्चरची) पुनर्बाधणी करणे गरजेचे आहे. सांगितले जाते की, समाजातील कायदा आणि सुव्यवस्थेचा एकमेव आणि प्राथमिक प्रदाता हा सरकार आहे. जवळपास २ कोटींपेक्षा जास्त खटले २०१४ पर्यंत भारतातील न्यायालयात प्रलंबित आहेत. या दीर्घकाळ चालणाऱ्या नागरी आणि गुन्हेगारी खटल्यांची आíथक किंमतही तितकीच. सामाजिक पायाभूत सुविधा निश्चयपूर्वक सुधारण्याची गरज आहे म्हणून भारतीय न्यायव्यवस्था आणि पोलीस यंत्रणा सुधारणे अत्यावश्यक आहे. शेवटी, चिनी नेता आणि चिनी अर्थव्यवस्थेचा मूळ सुधारक, राष्ट्राध्यक्ष डेंग क्सिओ िपगने टोमणा मारला आहे की : मला वाटते की मांजर काळे आहे की पांढरे याचा काही फरक पडत नाही, तर उंदराला पकडणारे ते चांगले मांजर असते. त्याचा एक साधा मुद्दा होता- हेकेखोर रंगापेक्षा व्यवहारचतुर उपयुक्तता जास्त महत्त्वाची आहे. विकास आणि समृद्धी येण्यासाठी व्यवहारचातुर्यतेची आशा करूया.
– संदेश किरकिरे, मुख्य कार्यकारी अधिकारी, कोटक म्युच्युअल फंड
अर्थसंकल्प कठोरच? – २
अर्थसंकल्प अपेक्षाविमा आणि बँकिंग विभाग व्यापक करण्याची गरजडीटीसी अर्थात प्रत्यक्ष करसंहिता व जीएसटी म्हणजेच वस्तू व सेवा कर हे दोन्ही गेल्या अनेक वर्षांपासून थांबलेले आणि उशिरा सुरू होणारे उपक्रम आहेत. त्यांनाही निश्चयपूर्वक एकत्र करण्याची गरज आहे. अंदाजपत्रकानुसार, जीएसटीचे एकत्रिकरण केल्यास …
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 06-07-2014 at 02:54 IST
मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Budget 014 finance minister arun jaitley to present better budget