यंदाची विधानसभा निवडणूक विलक्षण आणि ऐतिहासिक ठरली. य़ुती आणि आघाडीतील मित्रपक्षांनी  घटस्फोट घेतल्याने निवडणूक  पंचरंगी झाली. पैसे, दारू जे देतील ते घ्या, पण मतदान आम्हालाच करा असे एकाने सांगितले, तर दुसऱ्याने बलात्कारच करायचा होता तर निवडणुकीनंतर तरी करायचा, अशी मुक्ताफळे उधळली.  व्यक्तिगत आरोप झाले. मतदारांना वाटण्यासाठी वापरले जाण्याची शक्यता असलेले करोडो रुपये जप्त झाले. गेल्या दोन आठवडय़ांत माध्यमांमध्ये निवडणुकीच्या बातम्यांनाच प्राधान्य दिले गेले. वृत्तवाहिन्यांमधून विश्लेषण, चर्चात्मक कार्यक्रम यांना तर ऊत आला होता.  विविध संस्थांनी मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्ष जाहीर केल्यानंतर त्यावरही वादविवाद होत राहिले.  बघता बघता मतमोजणीचा दिवस आला. सर्वाचेच लक्ष निवडणूक निकालांकडे असताना राज्यातील काही प्रमुख व्यंगचित्रकारांनी रेखाटलेली ही व्यंगचित्रे.. निवडणूक, त्यातील घटना आणि संभाव्य घडामोडींवर मार्मिक
भाष्य करणारी..

vw01अहो, अगदी दिवसाढवळ्या, आमच्या डोळ्यादेखत, रोज जवळपास पंधरा वर्षे त्यांनी तिजोरी लुटली! पण आता आमची मैत्री नसल्याने मी त्यांच्यावर टीका करणार आहे!!   
vw02
पाहिलंत? पंधरा दिवसांपूर्वी आमच्या जिवलग मित्राने खुपसलेला हा खंजीर? आता सगळ्या प्रचारसभा होईपर्यंत आम्ही तो बाहेर काढणारच नाही!!vw03vw04vw05*तलवार आपण थोडी हलकीच आणायला हवी होती! कारण ‘राज्यात मला एकहाती सत्ता द्या’ असं तलवार उंचावून साहेबांनी म्हटलं असतं तर केवढा जल्लोष झाला असता!!

vw06vw07
‘बैलपोळा आज आहे हे तुम्ही मला निवडणुकी अगोदर का नाही सांगितलंत?’
‘ते तरी काय करणार? ’ पक्षश्रेष्ठींशीvw08

स्तुती करण्यासाठी त्यांना शब्द अपुरे पडू लागले!vw09vw10vw11vw12१.या इथे माझं एकटय़ाचं ‘एक मत’ आहे. राजकारणातला पैसा पाहून सगळे नागरिक  निवडणुकीला उभे राहिले आहेत, मी एकटात मतदार आहे!!
२.इथे मैत्रीपूर्ण लढत आहे. उमेदवार एकाच कुटुंबातील आहेत. वडील कॉँग्रेसमध्ये, बायको राष्ट्रवादीत, मुलगा शिवसेनेत, मुलगी भाजपात, नातू मनसेतर्फे उभा आहेvw13vw14vw15vw16
अहो नीट पाहिलंत का, निवडणुकीपूर्वी हाच माणूस आपल्याकडे मत मागायला आला होता.vw17vw18या पानाचे मानकरी
प्रशांत कुलकर्णी, खलील खान, संजय मिस्त्री, मंगेश तेंडुलकर, विवेक मेहेत्रे आणि श्रीनिवास प्रभुदेसाई