यंदाची विधानसभा निवडणूक विलक्षण आणि ऐतिहासिक ठरली. य़ुती आणि आघाडीतील मित्रपक्षांनी घटस्फोट घेतल्याने निवडणूक पंचरंगी झाली. पैसे, दारू जे देतील ते घ्या, पण मतदान आम्हालाच करा असे एकाने सांगितले, तर दुसऱ्याने बलात्कारच करायचा होता तर निवडणुकीनंतर तरी करायचा, अशी मुक्ताफळे उधळली. व्यक्तिगत आरोप झाले. मतदारांना वाटण्यासाठी वापरले जाण्याची शक्यता असलेले करोडो रुपये जप्त झाले. गेल्या दोन आठवडय़ांत माध्यमांमध्ये निवडणुकीच्या बातम्यांनाच प्राधान्य दिले गेले. वृत्तवाहिन्यांमधून विश्लेषण, चर्चात्मक कार्यक्रम यांना तर ऊत आला होता. विविध संस्थांनी मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्ष जाहीर केल्यानंतर त्यावरही वादविवाद होत राहिले. बघता बघता मतमोजणीचा दिवस आला. सर्वाचेच लक्ष निवडणूक निकालांकडे असताना राज्यातील काही प्रमुख व्यंगचित्रकारांनी रेखाटलेली ही व्यंगचित्रे.. निवडणूक, त्यातील घटना आणि संभाव्य घडामोडींवर मार्मिक
भाष्य करणारी..
इले‘क्षण’ चित्रं..
यंदाची विधानसभा निवडणूक विलक्षण आणि ऐतिहासिक ठरली. य़ुती आणि आघाडीतील मित्रपक्षांनी घटस्फोट घेतल्याने निवडणूक पंचरंगी झाली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 19-10-2014 at 12:19 IST
मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cartoons on maharashtra assembly election