लोकसभा निवडणुकीबरोबरच विधानसभा निवडणुका होणार या गृहितावर आधारित नुकत्याच पदाधिकाऱ्यांच्या निवडी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केल्या. भाजपमध्ये पदाला मर्यादा असत नाही हा आजपर्यंतचा अनुभव. दिसला कार्यकर्ता की गळय़ात गमछा आणि एखाद्या प्रभागाचा अथवा एखाद्या सेलचा अध्यक्ष करायचे. यामुळे कार्यकर्त्यांनाही आपण पक्षाचे एक जबाबदार पदाधिकारी असल्याचे वाटायला लागते. यामुळे घरीदारी तर मान उंचावतेच, पण पुढे मागे सत्तेच्या पंगतीला बसण्याचा बहुमानही मिळू शकतो ही भाबडी आशा तर असतेच म्हणण्यापेक्षा याच अपेक्षेने अनेक कार्यकर्ते आकर्षित होत असतात. मात्र, आता जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रमुख म्हणून आठ जणांची निवड करण्यात आली आहे. मुळात पक्षात अध्यक्ष, कार्याध्यक्ष, चिटणीस ही पदे असतात हे ज्ञात होते. मात्र निवडणूक प्रमुख ही नवीन प्रणाली पक्षाने विकसित केली आहे. नियुक्त करण्यात आलेले आठही जण मातब्बर आहेत. यामुळे आगामी निवडणुकीतील संभाव्य उमेदवार म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जात असून या सर्वाच्या ओठी आपसूकच गाणं आहे, ‘जवा बघतीस माझ्याकडं, मला आमदार झाल्यासारखं वाटतयं,’
चावडी: भावी उमेदवार?
लोकसभा निवडणुकीबरोबरच विधानसभा निवडणुका होणार या गृहितावर आधारित नुकत्याच पदाधिकाऱ्यांच्या निवडी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केल्या
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 13-06-2023 at 02:41 IST
TOPICSचंद्रशेखर बावनकुळेChandrashekhar Bawankuleनिवडणूक २०२४Electionभारतीय जनता पार्टीBJPविधानसभा निवडणूक २०२४Assembly Election 2024
मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrasekhar bawankule announced the election of office bearers on the assumption that assembly elections will be held along with the lok sabha elections amy