मराठी माणसाला राजकारण, नाटक – चित्रपट, क्रिकेट यावर बोलायला मनापासून आवडतं. नेते-अभिनेते यांनाही एकमेकाविषयीचे आकर्षण कायम राहिले आहे. नेत्यांना अभिनय करण्याची ओढ तर अभिनेत्यांना नेता बनण्याचे वेध लागलेले असतात. याचे कैक दाखले आहेत. असाच एक प्रसंग कागलमध्ये घडला. महापुरुषांच्या पुतळा अनावरणासाठी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना निमंत्रित केले होते. संयोजक होते ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ. नाना पाटेकर मंचावर असल्याचे पाहून मुश्रीफ यांना अभिनय करण्याची लहर आली. त्यांनी पाटेकर यांचे आठ-दहा प्रसिद्ध डायलॉग म्हणून दाखवले. त्याला टाळय़ांच्या गजरात प्रतिसाद मिळाला. त्यावर नाना पाटेकर यांनी मुश्रीफ यांना जवळ बोलावून थेट अभिनय करण्याचे निमंत्रणच दिले. खरोखरीच अभिनय करण्याच्या कल्पनेने मोहरलेले मुश्रीफ खदखदून हसू लागले. राजकारण्यांना वरताण करेल अशा पद्धतीचे प्रबोधनाचे डोस देत पाटेकर यांनी भाषण करीत अभिनेते नेत्यांपेक्षा कमी नसतात हे दाखवून दिले. शिवाय लोकाग्रहास्तव नटसम्राटमधील संवाद म्हणून दाखवले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा