माढा लोकसभा मतदारसंघात भाजपअंतर्गत खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुतणे धैर्यशील यांच्यातील सत्तासंघर्ष पेटलेला असताना त्यात शिवसेना शिंदे गटाचे सांगोल्याचे आमदार अॅड. शहाजीबापू पाटील यांनी खासदार निंबाळकर यांच्या बाजूने उतरले आहेत. यातून एकमेकांविरुद्ध कुरापती काढण्याचे प्रकार वाढले आहेत. वास्तविक पाहता कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्प हा मोहिते-पाटील कुटुंबीयांच्यादृष्टीने अतिशय आस्थेचा आणि जिव्हाळयाचा विषय. त्याची मोठी राजकीय किंमत मोहिते-पाटील यांनी पूर्वी राष्ट्रवादीत असताना चुकविली आहे. त्यानंतर भाजपमध्ये प्रवेश करताना दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: अकलूजच्या जाहीर सभेतच मोहिते-पाटील कुटुंबीयांविषयी आदर व्यक्त करताना त्यांच्या स्वनातील कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्प मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. गेल्या पाच-दहा वर्षांत भाजपच्या काळात या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी शासन पातळीवर फारशा हालचाली झाल्या नसल्या तरी दुसरीकडे कृष्णा-भीमा फ्लड डायव्हर्शन प्रोजेक्ट या इंग्रजी नावाने हालचाली सुरू आहेत. यात मोहिते-पाटील कुटुंबीय कोठेही नाहीत. खासदार रणजितसिंह निंबाळकर हे मात्र कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्प आपण मार्गी लावत असल्याचा दावा करीत आहेत. या मुद्दयावर सांगोल्याचे आमदार अॅड. शहाजीबापू पाटील हे कृष्णा-भीमा स्थिरीकरण मोहिते-पाटील यांच्यामुळे नव्हे तर खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्यामुळे साकारत असल्याचा दावा करून दोन्ही गटांतील संघर्षांत भर टाकली आहे. निंबाळकर-मोहिते संघर्षांत शहाजीबापूंनी मोहिते-पाटील यांना डिवचल्यामुळे मागील सांगोला विधानसभा निवडणुकीत कसेबसे काठावर निवडून आलेल्या शहाजीबापूंना पुढील काळात मोहिते-पाटील शिंगावर घेतील आणि त्यांना त्यांच्या आवडत्या झाडी, डोंगरातह्ण परत पाठवतील, अशा कडवट तयारीची भाषा मोहिते समर्थकांनी जाहीरपणे बोलायला सुरुवात केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा