मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील विजयाने भाजपच्या गोटात आनंद आणि उत्साहाचे वातावरण आहे. या तीन राज्यांच्या विजयाने लोकसभेची निवडणूक जिंकल्यातच जमा असल्याचा विश्वास भाजपच्या गोटात पसरला आहे. लोकसभा जिंकल्यावर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकालही अनुकूल लागेल, अशी भाजप नेत्यांना अटकळ आहे. महाविकास आघाडी सरकार कोसळणे, शिवसेना व राष्ट्रवादीत फूट, आगामी निवडणुकीकरिता अनुकूल वातावरण हे सारखे मनासारखे होत असले तरी भाजपमधील अस्वस्थता वेगळीच आहे. राज्यात महायुतीला पुन्हा सत्ता मिळाली तर मुख्यमंत्रीपद कोण ? या प्रश्न भेडसावत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोदी-शहा जोडीचा विश्वास संपादन केला आहे. भाजप नेत्यांच्या इशाऱ्याबाहेर शिंदे नाहीत. यामुळेच शिंदे यांनाच कायम ठेवले जाणार नाही ना? अशी भाजप नेत्यांच्या मनात पूसटशी भीती आहे. अर्थात, सारे जर-तरवर अवलंबून असले तरी मुख्यमंत्रीपद शिंदे यांच्याकडे सोपविल्यापासून भाजपच्या नेत्यांच्या चंद्रकांतदादा पाटील यांच्या भाषेत ‘मनावरील दगड’ अद्याप दूर झालेला नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा