सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने लांबलेल्या नगरपालिका निवडणुका आता ओबीसी आरक्षणासह होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अद्याप या निवडणुकीचा मुहुर्त ठरला नसला तरी इच्छुकांची धावपळ सुरू झाली आहे. ओबीसी आरक्षणामुळे नव्याने आरक्षण निश्चिती होणार असल्याने अनेकांचे डोळे प्रभाग कसा मिळतो याकडे लागले आहेत. जर संधी मिळाली तर यंदाच्या निवडणुकीत राजकीय जुगार खेळायचाच यासाठी वावराला गिऱ्हाईक लागते का याची चाचपणीही काहींनी सुरू केली आहे. इस्लामपुरात बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे यावेळची निवडणूक अटीतटीची होणार हे निश्चित दिसत आहे. याच विरोधकांची एकी होण्यापूर्वीच राष्ट्रवादीने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बालेकिल्ला हातात राखण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली असून पक्षाचा जाहीरनामाही प्रसिद्ध केला. अजून बाजारात तुरी.. पण, सत्ता लई भारी. अशीच राष्ट्रवादीची अवस्था.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा