झालं असं की, रेल्वे स्टेशनच्या पुनर्बाधणीच्या कार्यक्रमात खासदार इम्तियाज जलील आले ते काळे कपडे घालून. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाइन भाषण करणार होते. व्यासपीठावर बसलेल्या भाजपचे सरचिटणीस संजय केनेकर यांनी त्यांच्या कपडय़ावर आक्षेप घेतला. कुजबुज सुरू झाली. रेल्वे विभागाच्या वतीने आमंत्रित केलेल्या व्यासपीठावर केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड आणि मंत्री अतुल सावेही काहीसे अस्वस्थ झाले; पण प्रसंग रेटून नेत खासदार जलील यांनी भाषण केले. पांढरे कपडे घालणाऱ्यांचे अनेक काळेबेरे व्यवहार पाहिले आहेत, असं जोरदारपणे त्यांनी सांगितले. निषेध करण्याचा कोणताही इरादा नाही, असंही त्यांनी स्पष्ट केले. कपडे कोणते घालायचे याचे स्वातंत्र्य तरी द्या, असेही सुनावले. डॉ. कराड यांची स्तुती करून त्यांना पेचातही पकडण्यासाठी विमान उड्डाणे वाढवा, अशी सूचना जलील यांनी केली. राजकीय कोपरखळय़ा आणि कुरघोडय़ांचे जाहीर प्रदर्शन सुरू झाले आणि मग केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांनीही खासदार जलील यांचा उल्लेख ‘औरंगाबाद’चे खासदार असा केला. अजून छत्रपती संभाजीनगरचा खासदार आपल्याला निवडून द्यायचा आहे, असेही ते म्हणाले. एकच खासदार, पण त्यांची राजकीय विभागणी मात्र जोरदार.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा