राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आणि घडामोडींना वेग आला. विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपचे दोन, शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक असे पाच जण सहजपणे निवडून येतील. खरी चुरस ही सहाव्या जागेसाठीच आहे. माजी खासदार संभाजीराजे यांनी ही निवडणूक अपक्ष म्हणून लढविणार असल्याचे जाहीर केले. त्याच्या एक दिवस आधी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी संभाजीराजे यांच्या उमेदवारीबाबत महाविकास आघाडीतील घटक पक्षांशी चर्चा करावी लागेल, असे सांगत त्यांच्या उमेदवारीला राष्ट्रवादी पािठबा देईल, असे संकेत दिले. सातारचे उदयनराजे भोसले हे भाजपबरोबर असल्याने कोल्हापूरचे संभाजीराजे आपल्याबरोबर असलेले बरे, असे गणित असावे. पुण्यातील एक बडे बिल्डर चाचपणी करीत आहेत. त्यांनी अपक्ष आमदारांकडे खडा टाकून बघितला. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत ही ३१ मेपर्यंत असल्याने सहावा कोण याचा संभ्रम तोपर्यंत कायम राहणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा